कच्च अंड खाल्यामुळे आरोग्याला होणारे तोटे
कच्च्या अंड्यांमध्ये साल्मोनेला नावाचा बॅक्टेरिया आढळून येतो. अंड खाल्यानंतर हा बॅक्टेरिया शरीरात थेट प्रवेश करतो, ज्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे अंड नेहमी शिजवून खावं.
काहींना कच्च्या अंड्याची ऍलर्जी असते. अंड खाल्यानंतर अंगावर खाज येणे, पुरळ उठणे किंवा मुरूम येण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे कधीही ऍलर्जी असलेल्या व्यक्तींनी अंड्याचे सेवन करू नये.
अंड्यांमध्ये असलेले बॅक्टेरियामुळे विषबाधा होण्याची जास्त शक्यता असते. पोट किंवा आतड्यांचे आरोग्य बिघडून शरीरात विषारी घटक तयार होतात. त्यामुळे कच्ची अंडी खाऊ नये.
कच्च अंड शरीराची पचनक्रिया कमकुवत करून टाकते. त्यामुळे कच्च्या अंड्याचे सेवन करू नये. याशिवाय पोटासंबंधित समस्या असलेल्या लोकांनी चुकूनही कच्च्या अंड्यांचे सेवन करू नये.
शिजवलेल्या अंड्यांमध्ये अधिक प्रोटीन असते. पण कच्च्या अंड्यांमध्ये अजिबात प्रोटीन आढळून येत नाही. त्यामुळे आहारात प्रामुख्याने शिजवलेली अंडी खावीत.