जेवल्यानंतर कायमच पोटात गुडगुडल्यासारखे वाटते? मग 'या' घरगुती पेयांचे नियमित करा सेवन
पोटात कायमच जडपणा जाणवत असेल तर जेवल्यानंतर बडीशेप खावी किंवा बडीशेपचे पाणी प्यावे. यामुळे पोटात झालेला गॅस आणि ऍसिडिटी कमी होण्यास मदत होईल.
आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी आल्याच्या रसाचे सेवन करावे. आल्याचा रस सर्व आजारांवर प्रभावी ठरतो. आल्याच्या रसात अर्धा चमचा मध टाकावे.
दह्यामध्ये असलेले चांगले बॅक्टेरिया आणि प्रोबायोटिक्स आतडे निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात. अतिसार किंवा पोटदुखीच्या वेदना जाणवू लागल्यास वाटीभर दही खावे.
रात्री झोपण्याआधी नियमित हळदीचे दूध प्यावे. हळदीमध्ये असलेले घटक शरीरातील घाण बाहेर काढून टाकतात आणि लहान मोठ्या अवयवाला आलेली सूज सुद्धा कमी होते.
ऍसिडिटी आणि अपचनाच्या समस्येवर पुदिन्याची पाने प्रभावी ठरतात. पुदिन्याच्या पानांमध्ये असलेले मेंथॉल घटक शरीरात वाढलेली उष्णता कमी करतात.