कोंबडी किंवा कोणता पक्षी नाही तर इथे खडक घालतात अंडी; कारण वाचून तुम्हीही व्हाल अचंबित
गुलू हे गाव ग्रामीण भाग असून इथे शांततामय वातावरण पाहायला मिळते. उंच डोंगर, हिरवेगार शेत आणि वळणदार मातीचे रस्ते हे सर्वच ठिकाणाचे साैंदर्य आणखीनच वाढवतात
जर तुम्ही इथल्या खडकांमध्ये बारकाईने पाहिलं तर तुम्हाला यात लहान अंडाकृती आकाराचे दगड दिसून येतील, जे हळूहळू बाहेर पडतात. त्यांना पाहून असं वाटतं की जणू खडक त्या छोट्या दगडांना जन्म देत आहेत
खडकांमध्ये दिसून येणारा हा दुर्लभ नजारा नैसर्गिक शक्तींमुळे घडून आल्याचे सांगितले जाते.
जर्नल ऑफ जिओलॉजिकल रिसर्चनुसार, ही संपूर्ण घटना भूगर्भीय आहे. कॅल्शियम कार्बोनेट सारखी खनिजे हळूहळू मऊ शेलमध्ये जोडली जातात आणि क्षरणाने काढून टाकली जातात.
शास्त्रज्ञ याला "काँक्रीटीकरण" असे म्हणतात. लाखो वर्षांपासून, मऊ खडकांमध्ये खनिजे हळूहळू तयार होऊ लागतात, ज्यामुळे सिमेंटसारखी रचना तयार होते. याची झीज झाल्यानंतर ते अंडाकृती स्वरुपात दिसून येते