दारूचा हँगओव्हर उतरवायचा आहे? मग हे घरगुती उपाय ठरतील प्रभावी
दारुच्या नशेमुळे जर तुम्हाला स्वतःवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर ही नशा उतरवण्यासाठी तुम्ही लिंबूपाण्याचे सेवन करु शकता. लिंबूपाणी शरीराला विषमुक्त करण्यासाठी फायदेशीर ठरते.
अनेकांना ठाऊक नाही पण नारळ पाणी अल्कहोलच्या नशेतून आपल्याला शांत करण्यास मदत करते. हे नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट ड्रींक आहे.
स्वयंपाकघऱात उपलब्ध असलेल्या आल्यापासून तुम्ही रस तयार करु शकता. आल्याचा हा रस दारुचे व्यसन सोडण्यास तुमची मदत करेल.
यासाठी केळी आणि सफरचंदाचेही सेवन केले जाऊ शकते. यात आढळणारे पोटॅशियम आणि फायबर शरीरीला ऊर्जा मिळवून देते आणि पोट शांत करण्यास मदत करते
जर घरगुती उपाय करुनही तुम्हाला बरे वाटत नसेल तर यासाठी तुम्ही डाॅक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.