Male River: देशात वाहणारी एकमेव 'पुरुष नदी' माहितीये का? याला मिळालाय वडिलांचा दर्जा
अनेक धार्मिक ठिकाणीही नद्यांचे वास्तव पाहायला मिळते. अनेकजण या नद्यांमध्ये स्नान करून पापमुक्त होण्याचा प्रयत्न करतात. नद्यांवर लोकांची श्रद्धा आहे, ज्यामुळे त्यांची मनोभावनेने पूजा केली जाते
तुम्ही आजवर अनेक नद्यांचे नाव ऐकले असेल मात्र पुरुष नदीविषयी तुम्ही कधी ऐकले आहे का? वास्तविक देशात एका पुरुषाच्या नावावर नदी आहे, जिला ब्रह्मपुत्रा असे म्हटले जाते
ब्रह्मपुत्रा नदी ही भारतातील एकमेव नर नदी आहे जी पुरुषाच्या या नावाने ओळखली जाते. ब्रह्मपुत्राला भगवान ब्रह्माचा पुत्र म्हटले जाते. हिंदू धर्मात लोक इतर नद्यांप्रमाणेच या नदीची पूजा करतात
मिळालेल्या माहितीनुसार, ब्रह्मपुत्रा नदी ही हिमालयाच्या उत्तरेस असलेल्या तिबेटमधील पुरंग जिल्ह्यातील मानसरोवर तलावाजवळ उगम पावते
ब्रह्मपुत्रा नदी ही भारतातील दुसरी सर्वात मोठी नदी आहे. भारतातील या नदीची लांबी सुमारे २९०० किमी आहे. ब्रह्मपुत्रा नदी वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते. अरुणाचल प्रदेशात ही नदी दिह आणि आसाममध्ये ब्रह्मपुत्र तर चीनमध्ये ही नदी या-लू-त्सांग-पु आणि यारलुंग जगांबो जियांग इत्यादी नावांनी ओळखली जाते