सर्वच स्त्रियांना मेहेंदी काढायला खूप जास्त आवडते. कोणत्याही कार्यक्रमात हातांवर जर मेहेंदी नसेल तर तो कार्यक्रम पूर्ण झाल्यासारखे अजिबात वाटत नाही. प्रत्येक सणावारांच्या दिवशी हातांवर सुंदर आणि आकर्षक डिझाईनची मेहेंदी काढली जाते. गडद रंगाचे हात आणि मेहेंदीचा सुगंध सणाच्या वातावरणात भर घालतो. पण बऱ्याचदा मेहेंदी काढल्यानंतर ती व्यवस्थित रंगत नाही. रंग पूर्ण फिका पडून जातो. त्यामुळे हातांवरील मेहेंदीचा रंग गडद करण्यासाठी या टिप्स नक्कीच फॉलो करा. यामुळे हात सुंदर आणि उठावदार दिसतील. (फोटो सौजन्य – pinterest)
हातावरील मेहंदीचा रंग हवा गडद आणि उठावदार? मग नक्की ट्राय करा 'या' घरगुती टिप्स

मेहेंदी लावण्याआधी हात स्वच्छ धुवून कोरडे करून घ्यावे. त्यानंतर हातांवर निलगिरीचे तेल लावावे. यामुळे मेहेंदीचा रंग गडद होण्यास मदत होते.

मेहेंदी काढण्यासाठी सर्वप्रथम चांगल्या दर्जाचे आणि घरगुती तयार केलेल्या मेहेंदी कोनचा वापर करावा. यामुळे हातांवरील संवेदनशील त्वचेला कोणतीही हानी पोहचत नाही.

लग्न सोहळ्यात हातांवर काढलेली मेहेंदी खूप जास्त गडद हवी असल्यास तव्यावर लवंग गरम करून शेक घ्यावा. यामुळे मेहेंदी खूप जास्त रंगते.

मेहेंदी काढल्यानंतर रंग फिका वाटत असेल तर बाम, आयोडिक्स, विक्स किंवा मोहरीचे तेल इत्यादी पदार्थांचा वापर करू शकता. याशिवाय साखर पाणी लावल्यास मेहेंदीचा रंग गडद होईल.

मेहेंदी गडद करण्याचा अतिशय पारंपरिक उपाय म्हणजे पाणी न लावता हातांवर चुना लावावा. यामुळे दुसऱ्या दिवशी पर्यंत मेहेंदी अतिशय डार्क होते.






