पावसाळ्यात चुकूनही करू नका 'या' पदार्थांचे सेवन
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये दही, ताक किंवा दुधापासून बनवलेले थंड पदार्थ खाणे टाळावे. या पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. सतत थंड पदार्थ खाल्यामुळे सर्दी, खोकला किंवा अपचनाची समस्या उद्भवू शकते.
बाजारात विकत मिळणारे फळांचे सॅलड अजिबात खाऊ नये. कारण कोणत्याही वेळी कापून ठेवलेल्या फळांवर असंख्य माशा किंवा विषाणू बसतात. त्यामुळे हीच फळे पोटात गेल्यानंतर पोटात दुखणे, उलट्या होणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात.
निरोगी आरोग्यासाठी आहारात पालेभाज्यांचे सेवन केले जाते. मात्र पावसाळ्यातील भाज्यांमध्ये किडे, अळ्या ,जिवाणू चिटकून बसतात. हे विषाणू पोटात गेल्यानंतर अननपदार्थांमधून विषबाधा होऊ शकते.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तेलकट आणि तळलेल्या पदार्थांचे मोठ्या प्रमाणावर सेवन केले जाते. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल वाढण्यासोबतच इतरही समस्या वाढू लागतात.
थंडीच्या दिवसांमध्ये चुकूनही थंड पेय किंवा कोल्ड्रिंक पिऊ नये. कोल्ड्रिंक किंवा पेप्सीचे सेवन केल्यामुळे ताप, सर्दी किंवा खोकला होण्याची शक्यता असते.