‘तीन अडकून सीताराम’मधील ‘दुनिया गेली तेल लावत’ हे एनर्जेटिक गाणे प्रदर्शित! वैभव तत्ववादी, संकर्षण कऱ्हाडे, आलोक रजवाडे यांची धमाल मस्ती
‘दुनिया गेली तेल लावत’ हे तीन बिनधास्त मित्रांचे बिनधास्त गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. चित्रपटाच्या अफलातून ट्रेलरनंतर आता 'दुनिया गेली तेल लावत' हे एनर्जेटिक गाणे सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. परदेशात व्हेकेशनला गेलेल्या या तीन मित्रांची काय काय धमाल चालू आहे, हे या गाण्यातून दिसतेय. दुनियाची पर्वा न करता बेफीकर असलेले हे मित्र व्हेकेशनचा पुरेपूर आनंद लुटताना दिसत आहेत.