
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
जय भानुशाली आणि माही विज यांच्या घटस्फोटाच्या अफवांमुळे हे जोडपं चर्चेत आले आहेत. अभिनेत्रीने आता या दाव्यांना उत्तर दिले आहे आणि घटस्फोटाच्या अफवांना खोटे ठरवले आहे. माहीने सध्या सुरू असलेल्या बातम्यांवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे आणि त्यांना ‘खोट्या बातम्या’ म्हटले आहे. टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक, माही विज आणि जय भानुशाली हे त्यांच्या लग्नाबाबत बऱ्याच काळापासून चर्चेत आहेत, त्यानंतर आता माही विजने त्यांच्या घटस्फोटाचे सत्य उघड केले आहे. तिने ही खोटी बातमी पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करेल इशारा दिला आहे. अभिनेत्रीने या अफवा पसरवणे थांबवण्याचे सांगितले आहे.
योगिता चव्हाणनंतर आणखी एक टीव्ही अभिनेत्री घेणार डिवोर्स? लग्नाच्या 8 वर्षांनी घेतला मोठा निर्णय
माही विजने पतीसोबत घटस्फोटाबाबत सोडले मौन
एका इन्स्टाग्राम अकाउंटवर जय भानुशाली आणि माही विजच्या घटस्फोटाची बातमी शेअर केली आणि ती कमेंट सेक्शनमध्ये पोस्ट केली. माहीने या पोस्टवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आणि कायदेशीर कारवाई करण्याची घोषणा केली. इन्स्टाग्रामवरील बातम्यांना उत्तर देताना तिने सर्व दावे फेटाळून लावत लिहिले, “हे खोटे वृत्त आहे.” तिच्या लग्नाभोवती सुरू असलेल्या गोंधळाबद्दलच्या अटकळींदरम्यान तिचे हे विधान समोर आले आहे.
माही विज आणि जय भानुशालीचा घटस्फोट
माहीने कंमेंट केलेल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट आणि त्यांच्या फोटोमध्ये असे लिहिले होते, “सर्व काही संपले का? लग्नाच्या १४ वर्षांनंतर, जय भानुशाली आणि माही विज घटस्फोटाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. जुलै ते ऑगस्ट २०२५ दरम्यान घटस्फोटाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी होणार आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यांच्या तीन मुलांचा ताबाही निश्चित झाला आहे.” एका सूत्राने हिंदुस्तान टाईम्सला सांगितले की, “खूप प्रयत्न केले गेले आहेत, परंतु काहीही बदललेले नाही. ते खूप पूर्वी वेगळे झाले होते. त्यांनी काही महिन्यांपूर्वी घटस्फोटासाठी अर्ज केला होता.” माही विजने या पोस्टवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत कमेंट सेक्शनमध्ये लिहिले, “खोट्या गोष्टी पोस्ट करू नका. मी याविरुद्ध कायदेशीर कारवाई करेन.” हे जोडपे शेवटचे त्यांच्या मुली ताराच्या वाढदिवसाच्या पार्टीत एकत्र दिसले होते.
परेश रावल यांच्या ‘द ताज स्टोरी’ चित्रपटावर बंदी घालण्याची भाजप नेत्याची मागणी, नेमकं प्रकरण काय?
माही विज आणि जय भानुशाली यांनी गुपचूप केले लग्न
जय आणि माही यांनी २०११ मध्ये लग्न केले आणि २०१९ मध्ये तारा नावाच्या एका लहान मुलीचे पालक झाले. ते राजवीर आणि खुशी यांनाही त्यांच्या स्वतःच्या मुलांप्रमाणे वाढवत आहेत, ज्यांचे त्यांनी २०१७ मध्ये त्यांच्या घरात स्वागत केले होते. माही आणि जय यांनी २०११ मध्ये गुपचूप लग्न केले होते. २०१४ मध्ये त्यांनी लास वेगासमध्ये पुन्हा लग्न केले.