
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
‘जीव माझा गुंतला’ या नुकत्याच लोकप्रिक मालिकेतून घराघरात पोहचलेले योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले हे दोघेही प्रसिद्धीच्या झोतात आले आहे. या दोघांनी एकमेकांसोबत लग्न करून चाहत्यांना चकीत केले आणि आत या दोघांच्या नात्यात दुरावा आला आहे. आणि दरम्यान आता मराठी कलाविश्वातील आणखी एका अभिनेत्रीच्या संसारात वादळ आल्याचे समोर आले आहे. आई कुठे काय करते या मालिकेतून घराघरात पोहचलेली ही अभिनेत्री गेल्या काही दिवसांपासून नवऱ्यापासून वेगळी राहत आहे. तसेच या दोघांनीही एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केलं आहे.
‘क्योंकि सास भी कभी बहू थी 2’ लवकरच होणार बंद? स्मृती इराणीच्या मालिकेबाबत समोर आली मोठी बातमी
आई कुठे काय करते मालिकेतून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री अक्षया गुरव आणि दिग्दर्शक भूषण वाणी यांच्याही नात्यात अडचणी आल्याचे समजले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून ते दोघे वेगळे राहत असल्याचे समजले आहे. तसेच सोशल मीडियावर त्यांनी एकमेकांना अनफॉलोदेखील केलं आहे. त्या दोघांच्या सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटोदेखील पाहायला मिळत नाही आहेत. याशिवाय लग्नाचे फोटोदेखील त्यांनी डिलीट केले आहेत. यावरून त्यांच्या नात्यात दुरावा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अद्याप अक्षया आणि भूषण या दोघांनीही यावर भाष्य केलेले नाही आहे.
लग्नाच्या ८ वर्षांनंतर या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. अक्षया आणि भूषण एकमेकांना एका कॉमन फ्रेंडच्या घरी भेटले होते आणि पहिल्याच भेटीमध्ये भूषणचे वागणे-बोलणे पाहून अक्षया त्याच्या प्रेमात पडली. अगदी काही महिने डेट केल्यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. २३ मे, २०१७ साली ते लग्नबेडीत अडकले. लग्नाच्या ८ वर्षांनंतर आता ते वेगळे झाले असल्याचे बोलले जात आहे. ८ वर्षांचा संसार या जोडप्यांनी मोडला आहे.