हिवाळ्यात करा 'या' पेयांचे सेवन
हिवाळ्यात साथीच्या आजरांपासून दूर राहण्यासाठी काढा प्यायला जातो. काढा प्यायल्यामुळे पोटातील घाण स्वच्छ होते, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.
सर्वच घरांमध्ये हळदीचा वापर केला जातो. हळदीमध्ये असलेले विटामिन सी आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. हळदीच्या दुधाचे सेवन केल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
दाहक विरोधी गुणधर्म असलेला आल्याचा चहा आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे. आल्याचा चहा प्यायल्यामुळे हिवाळ्यात ऍलर्जीपासून शरीराचे नुकसान होत नाही.
सकाळी उठल्यानंतर नियमित ग्रीन टी चे सेवन करावे. ज्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडून जाण्यास मदत होते आणि शरीरातील पेशी हायड्रेटेड राहतात.
हिवाळ्यामध्ये रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्यानंतर चहा पिण्यावेजी बदामाच्या दुधाचे सेवन करावे. बदाम दूध प्यायल्यामुळे शरीरात ऊब निर्माण होते आणि आरोग्याला फायदे होतात.