ऑफिसमध्ये स्टयलिश दिसण्यासाठी फ्लोरल प्रिटेंड साड्यांचे खास कलेक्शन!
हल्ली फ्लोरल प्रिंट्स साड्यांचा मोठा ट्रेंड आहे. या साड्या नेसल्यानंतर अतिशय स्टायलिश आणि उठावदार लुक दिसतो. त्यामुळे शिफॉन फॅब्रिकमधील साडीवर सुंदर फुलांचे नक्षीकाम असेलली साडी खरेदी करू शकता.
ऑफिसमधील पार्टीला किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमात तुम्ही या डिझाइन्सची सुंदर साडी नेसू शकता. नेटच्या साडीवर पांढऱ्या किंवा इतर रंगाच्या धाग्याचे नक्षीकाम हटके दिसते.
कामाच्या धावपळीमध्ये अनेकांना तयार होण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. अशावेळी तुम्ही या डिझाइन्सची साडी नेसून कमीत कमी वेळात सुंदर तयार होऊ शकता. कॉटनच्या साडीवर पांढऱ्या फुलांचे वर्क अतिशय सुंदर दिसते.
सर्वच महिलांकडे साऊथ पार्टनमधील पांढऱ्या रंगाची साडी असते. या साडीवर तुम्ही फॅब्रिक पेंटिंग करून वेगवेगळी फुले काढू शकता. पांढऱ्या साडीवर तुम्ही रंगीत फुले काढू शकता.
डिझाइनर साडीवर प्रामुख्याने वेगवेगळ्या टिकल्या किंवा खड्यांचा वापर करून फुलांच्या आकारात नक्षीकाम केले जाते. या डिझाईन्सच्या साड्या सर्वच कार्यक्रमात तुम्ही नेसू शकता.