ब्लाऊजच्या मागील गळ्यावर करा 'या' डिझाईनचे आकर्षक वर्क
साडीवरील लुक आणखीनच उठावदार आणि सुंदर करण्यासाठी ब्लाऊजच्या मागील गळ्याला तुम्ही आरी वर्क केलेले देवीचे सुंदर रूप तयार करून घेऊ शकता. हॅन्ड मेड वर्क करून तयार केलेले ब्लाऊज पॅचवर्क सिल्क, ब्रोकेड किंवा कॉटन फॅब्रिकच्या ब्लाऊजवर अतिशय खुलून दिसते.
ब्लाऊजच्या मागील गळ्याला तुम्ही तुळजाभवीनीचे पॅचवर्क किंवा आरी वर्क करून घेऊ शकता. पैठणी किंवा कांजीवरम सिल्क साडीवर आरी वर्क अतिशय सुंदर दिसते.
पांढऱ्या रंगाच्या साडीवरील ब्लॉउजवर तुम्ही रुक्मिणी किंवा इतर कोणत्याही देवीचे आरी वर्क करून घेऊ शकता. यामुळे चारचौघांमध्ये तुमचे ब्लाऊज उठावदार दिसेल.
कामाच्या धावपळीमध्ये ब्लाऊज आकर्षक करण्यासाठी जास्तीचा वेळ मिळत नाही, अशावेळी तुम्ही हॅन्ड पेंटिंग केलेले ब्लाऊज बनवून घेऊ शकता. हॅन्ड पेंटिंग ब्लाऊजची सगळीकडे मोठी क्रेझ आहे.
पारंपरिक भरतकाम, जरी वर्क आणि ट्रेंडी कटवर्क केलेले ब्लाऊज अतिशय सुंदर दिसतात. हे ब्लाऊज कोणत्याही साडीवर घालू शकता.