लग्नातील रिसेप्शन लुकसाठी नेसा 'या' रंगाचे सुंदर शालू
लग्नाच्या रिसेप्शनमध्ये बऱ्याच मुली मरून रंगाच्या साडीची निवड करतात. मरून रंग सर्वच त्वचेच्या रंगावर अतिशय सुंदर दिसतो.
सर्वच मुलींना डार्क गुलाबी रंग खूप आवडतो. त्यामुळे लग्नाच्या रिसेप्शनमध्ये तुम्ही डार्क गुलाबी रंगाचा शालू परिधान करून त्यावर सुंदर खड्यांचे किंवा कुंदन असलेले दागिने परिधान करू शकता.
कोणत्याही त्वचेच्या रंगावर जांभळा रंग अतिशय सुंदर आणि उठावदार दिसतो. जांभळ्या रंगाच्या सुंदर बनारसी साडीवर तुम्ही पांढऱ्या मोत्याचे किंवा सोन्याचे दागिने परिधान करू शकता.
लग्नात इतरांपेक्षा हटके आणि स्टयलिश लुक हवा असेल तर तुम्ही निळ्या रंगाच्या बनारसी साडीची निवडकरू शकता. बनारसी साड्यांमध्ये अनेक वेगवेगळ्या रंगाचे शेड्स उपलब्ध आहेत.
रिसेप्शन लुकसाठी तुम्ही लाल रंगाची बनारसी साडी निवडू शकता. कारण लाल रंगाच्या साडीमध्ये तुमचा लुक अतिशय रॉयल आणि हटके दिसेल.