लग्नातील रिशेप्शन लुकसाठी 'या' रंगाच्या डिझायनर लेहेंग्याची करा निवड
लग्नातील रिशेप्शनसाठी तुम्हाला जर रॉयल लुक हवा असेल तर तुम्ही लाल रंगाच्या लेहेंग्याची निवड करू शकता. लाल रंग अतिशय उठावदार दिसतो.
लाईट पीक, बेबी पिंक इत्यादी गुलाबी रंगातील अनेक वेगवेगळे शेड्स ट्रेडींगला आहेत. त्यामुळे तुम्ही डायमंड आणि वेगवेगळ्या मण्यांचा वापर करून बनवलेला लेहेंगा खरेदी करू शकता.
लग्नात अनेकांना मिनिमल लुक हवा असतो. साध्या लेहेंग्यावर हेवी किंवा डायमंड असलेले दागिने घातल्यास लुक उठावदार आणि स्टायलिश दिसेल.
लग्नात नववधू अतिशय साधा आणि सहज होईल असा मेकअप पर्याय निवडत आहेत. कारण डिझाईन लेहेंग्यावर जास्त मेकअप केल्यास लुक पूर्णपणे वेगळा दिसतो.
लग्नातील रिसेप्शन लुकसाठी तुम्ही डिझायनर साडीची सुद्धा निवड करू शकता. डायमंड आणि नाजूक भरतकाम करून तयार केलेली साडी अतिशय सुंदर दिसते.