प्रत्येक महिलेच्या कपाटात वेगवेगळ्या रंगाच्या, डिझाईनच्या आणि पारंपरिक पद्धतीने विणकाम केलेली एक तरी साडी ही असतेच. सर्वच महिला सणावाराच्या दिवसांमध्ये किंवा इतर वेळी कार्यक्रमात छान साडी नेसून तयार होतात. भारतीय संस्कृती कारागिरीचे आणि राजेशाही शैलीचे प्रतिनिधित्व करते. त्यातील एक प्रसिद्ध साडी म्हणजे बनारसी साडी. लग्न, सणवार आणि इतर कार्यक्रमाच्या दिवशी अधिक सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी महिला बनारसी साडी नेसतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला बनारसी साडीचे काही सुंदर प्रकार सांगणार आहोत. या फॅब्रिकची एकतरी बनारसी साडी तुमच्याकडे असायलाच हवी. (फोटो सौजन्य – pintrest)
बनारसी साडीचे 'हे' प्रकार सगळ्यांचं करतील आकर्षित
चिनया नावाच्या रेशमी धाग्यांपासून बनारसी चिनिया सिल्क साडी तयार केली जाते. ही साडी किमतीने अतिशय महाग नाही. त्यामुळे सणावाराच्या दिवसांमध्ये नेसण्यासाठी तुम्ही चिनिया सिल्क बनारसी साडी विकत घेऊ शकता.
कॉटनची साडी सर्वच महिलांना खूप जास्त आवडते. त्यामुळे शुभ प्रसंगी घालण्यासाठी कॉटन बनारसी साडी विकत घेऊ शकता. ही साडी पूर्णपणे रेशमी धाग्यांचा वापर करून विणली जाते. साडी विणण्याची प्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची आहे. साडीची बॉर्डर आणि पदरावरील जरीचे काम सगळ्यांच आकर्षित करते.
बनारसी ज्यूट सिल्क साड्या बनवण्यासाठी उच्च दर्जाच्या सिल्कचा वापर केला जातो. ही साडी अंगावर नेसल्यानंतर अतिशय सुंदर आणि स्टयलिश लुक देते.
हल्ली ऑर्गेन्झा साड्यांचा मोठा ट्रेंड आहे. टिश्यू बनारसी साडी जरी आणि सिल्क अशा दोन्ही पद्धतीने बनवली जाते. लग्नापासून ते सणांपर्यंत सर्वच कार्यक्रमांमध्ये तुम्ही टिश्यू सिल्क साडी नेसू शकता.
शिफॉन फॅब्रिकपासून बनवलेली बनारसी साडी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नेसण्यासाठी उत्तम पर्याय आहे. कोणत्याही ऑफिस मीटिंगला किंवा पार्टीला तुम्ही या पद्धतीची शिफॉन बनारसी साडी नेसू शकता.