वटपौर्णिमेला चंद्रकोर क्लिप लावून केसांची करा सुंदर हेअरस्टाईल
सणावाराच्या दिवसांमध्ये नेमकी काय हेअर स्टाईल करावी सुचत नाही. अशावेळी आंबाडा किंवा वेणी घालून त्यावर तुम्ही छोटे छोटे चंद्रकोर क्लिप लावू शकता.
काहींना केसांमध्ये अतिशय नाजूक क्लिप लावायला आवडतात. अशावेळी तुम्ही या डिझाइन्सचे सुंदर क्लिप लावू शकता. हे क्लिप नऊवारी किंवा सहावारी साडीवर सुद्धा सुंदर दिसतील.
लांब केस असलेल्या महिलांना साडी नेसल्यानंतर केसांची काय हेअर स्टाईल करावी? असा जर प्रश्न पडत असेल तर तुम्ही वेणी घालून या डिझाइन्सचे सुंदर चंद्रकोर क्लिप केसांवर लावू शकता.
साडी नेसल्यानंतर मोत्याचे दागिने परिधान केल्यानंतर तुम्ही मोत्याचा वापर करून बनवलेले चंद्रकोर क्लिप केसांमध्ये स्टाईल करू शकता. यामध्ये अनेक वेगवेगळ्या डिझाइन्स बाजारात उपलब्ध आहेत.
सणावाराच्या दिवशी पारंपरिक पद्धतीमध्ये महिला तयार होतात. त्यामुळे अंबाडा हेअर स्टाईल केल्यानंतर तुम्ही या डिझाइन्सची चंद्रकोर केसांमध्ये लावू शकता. यामुळे तुमचा लुक पारंपरिक दिसेल.