फोटो सौजन्य- pinterest
डंबफोन्स ग्राहकांना स्वस्त किमतीत उपलब्ध होतात. या फोनमध्ये सर्व आवश्यक ॲप्स उपलब्ध आहेत, जे दैनंदिन वापरासाठी वापरले जाऊ शकतात. फीचर फोन्समध्ये स्मार्टफोन सारखी अनेक वैशिष्ट्ये नाहीत, परंतु कॉल, टेक्स्ट, गाणी इत्यादी मूलभूत सुविधांसाठी, कमी बजेटमध्ये हा एक चांगला पर्याय आहे.
स्मार्टफोनमध्ये अनेक फीचर्स आणि ॲप्स उपलब्ध असतात. पण हो फोन प्रत्येकाच्या खिशाला परवडेलच असं नाही. त्यामुळे कमी बजेट आणि उत्तम फीचर्समुळे लोकं डंबफोन्सला पसंती देत आहेत.
सोशल मीडियावर तासनतास घालवणाऱ्या लोकांसाठी डंबफोन हा एक चांगला पर्याय बनत आहे. यामुळे लोक सोशल मीडियापासून दूर जात आहेत. त्यामुळे डंबफोन लोकांच्या वास्तविक जीवनावर लक्ष केंद्रित करण्याचा आणखी एक मार्ग प्रदान करत आहे.
स्मार्टफोन खरेदी करताच आपण त्यामध्ये सर्व सोशल मिडीया ॲप्स डाऊनलोड करतो. या ॲप्सवर आपण आपला बराच वेळ वाया घालवतो. अशा परिस्थितीत डंबफोन्स जास्त फायदेशीर ठरू शकतात.
फीचर फोनमध्ये सायबर फ्रॉडचा धोका कमी असतो. यामध्ये लोकांची प्रायव्हसीही सहजासहजी लीक होत नाही. सामान्य स्मार्टफोनपेक्षा फीचर फोनचे आयुष्य जास्त असते. हे स्वस्त आहेत आणि त्यांच्या दीर्घ आयुष्यामुळे लोकांना आकर्षित करतात.
स्मार्टफोनच्या माध्यमातून आपण फोन पे, गुगल पे आणि बँकेचे अनेक व्यवहार करतो. काहीवेळा स्मार्टफोनमधील डेटा लीक होण्याची देखील शक्यता असते. मात्र फीचर फोनमध्ये सायबर फ्रॉडचा धोका कमी असतो.