
Home Credit India ची खास दिवाळी मोहीम #ApnoKeSaathDiwali लाँच ( सौजन्य - सोशल मीडिया )
मोहिमेची जाहिरात आता यूट्यूब, इन्स्टाग्राम, फेसबुक, X आणि लिंक्डइनवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे. या मोहिमेच्या केंद्रस्थानी मोठे होणे, घरापासून दूर जाणे आणि एकमेकांशी जोडलेले राहण्याचे नवनवीन मार्ग शोधणे ही आपल्या परिचयाची कहाणी आहे. मनिष हा तरुण व्यावसायिक आहे, जो आपल्या शिमल्यातील मूळ घरापासून दूर मुंबईत स्थायिक झाला आहे, कामाच्या व्यापामुळे दिवाळीसाठी घरी जाऊ शकत नाही. “आप लोग यहाँ आ जाओ ना,” असे तो आपल्या आई-वडिलांना सांगतो.
आपल्या मुलाला नेहमीच घरासारखे वाटावे यासाठी वर्षानुवर्षे झटणाऱ्या पालकांसाठी त्याच्या स्वतःच्या घरात पाऊल ठेवणे हा नवा अनुभव ठरतो. त्यांच्यासाठी ते त्याचे घर होते, जे अशा एका जीवनाने आकारास आले होते ज्याचा ते दररोज भाग नव्हते. मुलाने घेतलेली घरातील अप्लायन्सेस वडील पाहतात, तेव्हा मनिष त्यांना सांगतो की, हे सर्व त्याच्या स्वतःच्या मेहनतीचे फळ आहे आणि आपली बचत सुरक्षित राहावी म्हणून उर्वरित बाबींसाठी होम क्रेडिटच्या सहयोगाची मदत झाली आहे. यानंतर त्यांच्या मनात अभिमानाची भावना दाटून येते. आपण ज्या मुलाची एकेकाळी काळजी घेतली होती, तो मुलगा आता स्वतःची काळजी घेण्यास पूर्णपणे सक्षम झाला आहे, याची जाणीव वडिलांना होते.
सर्वात मोठा आणि सुखद अनुभव तेव्हा येतो, जेव्हा शेजारी आणि मित्रमंडळी घरी येऊ लागतात, ते पालकांचे प्रेमाने स्वागत करतात आणि त्यांच्या मुलाबद्दलच्या आठवणी व गोष्टी शेअर करतात. हळूहळू, तो अनोळखी वाटणारा फ्लॅटही घरासारखा भासू लागतो.
जाहिरातीचा भावनिक गाभा या भूमिकेतील बदलामध्ये (रोल रिव्हर्सल) आहे. ज्या पालकांनी एकेकाळी आपल्या मुलासाठी आपलेपणाची भावना निर्माण केली होती, तेच पालक आता मुलाने स्वतः उभारलेल्या घरात तीच भावना अनुभवतात. संध्याकाळ हास्यविनोद, गप्पागोष्टी आणि दिवाळीच्या रीतीरिवाजांनी उजळून निघते, तसतसे कुटुंबाला जाणीव होते की, घर हे केवळ एखाद्या विशिष्ट ठिकाणाशी किंवा त्याच्याशी जोडलेल्या जुन्या आठवणींशी बांधलेले नसते. आयुष्य जिथे घेऊन जाईल, तिथे माणसे एकमेकांसाठी जे तयार करतात, तेच खरे घर असते.
या कथेच्या माध्यमातून, होम क्रेडिट इंडिया दिवाळीचे भावनिक महत्त्व भारतातील आधुनिक कुटुंबांच्या दैनंदिन आकांक्षांशी जोडते. ही जाहिरात जीवनातील या नव्या सुधारणांना केवळ भौतिक वस्तू म्हणून न पाहता स्वावलंबी जीवन अधिक सुखकर बनवणारे आणि महत्त्वाच्या नात्यांशी जोडलेले राहून स्वतःचे जीवन घडवण्यास मदत करणारे छोटे संपादन म्हणून सादर करते.
या मोहिमेबाबत मत व्यक्त करत होम क्रेडिट इंडियाचे चीफ मार्केटिंग अँड पीपल ऑफिसर आशिष तिवारी म्हणाले , “मुलं मोठी होतात आणि स्वतःचे आयुष्य घडवतात, तसतसे पालकांशी असलेले त्यांचे नातेही हळुवारपणे बदलते. या जाहिरातीच्या माध्यमातून आम्हाला हीच सुंदर भूमिका-अदलाबदल कॅप्चर करायची होती, जिथे पालक मुलांनी उभारलेल्या जगात पाऊल ठेवतात आणि त्यांची झालेली प्रगती पाहून अचंबित होतात. ही एक आठवण आहे की, आयुष्य आपल्याला नव्या दिशांना घेऊन जात असले, तरी आपण ज्या मूल्यांसह आणि नात्यांसह मोठे झालो, तीच मूल्ये आपण कोण बनतो हे घडवत राहतात”.
“#ApnoKeSaathDiwali च्या माध्यमातून आम्ही आमच्या #ZindagiHit संकल्पनेचा भावनिक गाभा प्रत्यक्षात आणला आहे, जिथे आपले प्रियजन प्रत्येक पावलावर आपल्यासोबत असतात आणि होम क्रेडिट देखील त्यांच्या सहयोगाने त्यांच्या पाठीशी उभे राहते, दैनंदिन गरजांमधील सुधारणा अधिक सुलभ बनवून भावी महत्त्वाकांक्षा आजचे वास्तव बनवण्यास मदत करते. ही मोहीम नवीन सुरुवात स्वीकारणे आणि सर्वात महत्त्वाच्या नात्यांशी घट्ट जोडलेले राहणे यांमधील समतोल साजरा करते, तसेच ग्राहकांना त्यांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यात आणि स्वतःसाठी व कुटुंबासाठी चांगले भविष्य घडवण्यात मदत करण्याच्या होम क्रेडिटच्या कटिबद्धतेला अधिक दृढ करते.”
जाहिरातीचा शेवट व्हॉइसओव्हरने होतो, जो ग्राहकांच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची, अंतर कमी करण्याची, जीवनातील सुधारणा सुलभ करण्याची आणि भावी महत्त्वाकांक्षांना आज अधिक जवळ आणण्यास मदत करण्याची ब्रँडची कटिबद्धता पुन्हा अधोरेखित करतो.
Ans: होम क्रेडिट इंडियाच्या नवीन दिवाळी मोहिमेचे नाव #ApnoKeSaathDiwali असे आहे, जी 'घर वहाँ, घरवाले जहाँ' या संकल्पनेवर आधारित आहे.
Ans: यात मुलं मोठी झाल्यावर स्वतःचे घर कसे उभी करतात आणि जेव्हा त्यांचे आई-वडील त्या नवीन घरात येतात, तेव्हा त्यांच्या नात्यात आणि भूमिकेत कसा सुंदर बदल होतो, हे भावनिकरीत्या दाखवले आहे.
Ans: आशिष तिवारी हे होम क्रेडिट इंडियाचे चीफ मार्केटिंग अँड पीपल ऑफिसर आहेत.