कुर्ग: पावसाळ्यात अनेक जण समुद्रकिनारी किंवा हिल्स स्टेशनला फिरायला जातात. पावसाळ्यात कर्नाटकातील कुर्ग म्हणजे निसर्गाने दिलेलं वरदान आहे. हिरवी गर्द झाडी आणि धुकं पांघरलेलं कुर्ग शहर पर्यटकांच्या स्वर्गसुखाची अनुभूती देतं.
कोडाईकनाल: तामिळनाडूतील अतिशय नयनरम्य म्हणजे कोडाईकनाल. थंड हवेचं ठिकाणं म्हणून हे ठिकाण प्रसिद्ध आहे. पावसात आणि थंडीत डोंगरांवर मोठ्या प्रमाणात धुकं दाटतं. जे पाहणं पर्वणी आहे.
नैनिताल:उत्तराखंडमधील निसर्ग सौंदर्याने वेढलेलं हे छोटसं गाव. धुक्याने वेढलेलं हे गाव अनुभवण्यासाठी पर्यटक येतात. नैनिताल पावसात धुक्यानेअतिशय सुंदर दिसतं.
लोणावळा : पुण्या-मुंबईपासून जवळंच आणि एका दिवसात जाता येईल असं ठिकाण म्हणजे लोणावळा. लोणावळा घाट म्हणजे पुणे-मुंबईतील पर्यटकांचं हक्काचं ठिकाण. पाऊस पडल्यानंतर दाटलेलं धुकं आणि इंद्रधनुष्य पाहणं म्हणजे स्वर्गसुखाची अनुभूती असते.
रायगड: पावसाळ्यात गड किल्यांवर ट्रेकला जाणं कोणाला आवडत नाही? राकट आणि कणखर असला तरी त्याच्या सौंदर्याने वेड लावणारा गड म्हणजे रायगड. रायगडाचं सौंदर्य अनुभवण्यासाठी एकदातरी पावसाळ्यात ट्रेक करा.