साडी नेसताना फॉलो करा डॉली जैन यांनी सांगितलेल्या काही सोप्या टिप्स
कोणत्याही प्रकारातील साडी नेसण्याआधी तिला कडक इस्त्री करून घ्यावी. साडीला इस्त्री केल्यामुळे साडीच्या निऱ्या,पदर चापून चोपून बसतो. साडीला इस्त्री न केल्यामुळे तुमचा पूर्ण लुक खराब होऊ शकतो.
साडीच्या निऱ्या काढताना खालच्या भागात आणखीन एक कापड जोडून घ्यावे, ज्यामुळे साडीच्या निऱ्या व्यवस्थित येतील. सहा पद्धतीने निऱ्या काढल्यास लवकर सुटणार नाहीत.
साडीला इस्त्री करताना साधी इस्त्री करण्याऐवजी स्टीम इस्त्रीचा वापर करावा. ज्यामुळे साडीचा सुळसुळीतपणा कमी होतो आणि साडी व्यवस्थित अंगाला बसते.
साडी नेसल्यानंतर साडीला ३ ते ४ ठिकाणी व्यवस्थित पिनअप करून घ्यावे. ज्यामुळे साडी बराच वेळ व्यवस्थित राहील, साडीच्या निऱ्या किंवा पदर खाली येणार नाही.
काखेत आलेल्या घामामुळे ब्लाऊज खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे ब्लाऊज घालण्याआधी अंडरआर्म पॅडचा वापर करावा. यामुळे तुमचा ब्लॉउज खराब होणार नाही. ब्लॉउजची इस्त्री कायम टिकून राहील.