लिव्हर डॅमेज होणे वाचविण्यासाठी आपल्या आहारात नक्की कोणत्या पदार्थांचा समावेश करून घ्यावा याबाबत आपण अधिक माहिती घेऊया
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, डाळींमध्ये फायबर आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. याच्या सेवनाने अन्न पचण्यास मदत होते, जे यकृताच्या कार्यासाठी खूप फायदेशीर आहे
फळे आणि भाज्यांमध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. यामुळे यकृताचे कार्य खूप चांगले होते. ज्यामुळे त्याच्यावर कोणताही अतिरिक्त भार पडत नाही आणि तो चांगल्या प्रकारे सक्रिय राहतो
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे लिव्हरचे नुकसान होण्यापासून संरक्षण करण्यास आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात. म्हणून त्यांचे सेवन फायदेशीर मानले जाते
लिव्हर तंदुरुस्त ठेवण्यात काजू आणि बियादेखील प्रभावी भूमिका बजावतात. त्यामध्ये निरोगी चरबी आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात. जे अन्न पचवून लिव्हर निरोगी ठेवते
संपूर्ण धान्यांमध्ये फायबर असते, जे पचनास मदत करते आणि यकृत निरोगी ठेवते. म्हणून, आपण स्नॅक्स किंवा जंक फूडऐवजी संपूर्ण धान्य खाण्याला प्राधान्य दिले पाहिजे