देखण्या त्वचेसाठी नियमित करा डाळिंबाच्या रसाचे सेवन
हृदयाच्या आरोग्यासाठी डाळिंब अतिशय प्रभावी आहे. डाळिंबाचा रस नियमित प्यायल्यास त्वचा अधिक स्वच्छ आणि सुंदर राहते. रक्त शुद्ध करण्यासाठी डाळिंबाच्या रसाचे नियमित सेवन करावे.
वाढलेले वजन कमी करताना कोणत्याही ड्रिंकचे सेवन करण्याऐवजी डाळिंबाच्या रसाचे सेवन करावे. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी डाळिंबाचा रस प्यायल्यास वजन झपाट्याने कमी होईल.
कर्करोगाच्या हानिकारक पेशींपासून शरीराचे नुकसान होऊ नये म्हणून नियमित डाळिंबाचा रस प्यावा. डाळिंबाचा रस कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करतो.
सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे त्वचेवर काहीवेळा पिंपल्स येणे, काळे डाग किंवा पुरळ येण्याची शक्यता असते. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी डाळिंबाचा रस प्यावा.
शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी डाळिंबाचा रस प्यावा. या रसात असलेल्या गुणधर्मांमुळे शरीरात लोह वाढते, याशिवाय रक्ताची कमतरता दूर होते.