सोप्या पद्धतीमध्ये बनवा साबुदाण्याची तिखट खीर
नवरात्री उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. संपूर्ण राज्यभरात नवरात्री सणाचा उत्साह आहे. अनेक ठिकाणी देवीचे आगमन करून विधिवत पूजा करून वेगवेगळ्या पदार्थांचा नैवेद्य देवीला अर्पण केला जातो. याशिवाय नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये महिलांसह पुरुषसुद्धा उपवास करतात. नऊ दिवस मनोभावे उपवास करून देवीची आराधना केली जाते. हा उपवास नवमीच्या दिवशी सोडला जातो. उपवासाच्या दिवशी नाश्त्यात किंवा दुपारच्या जेवणात उपवासाला आहार घेतला जातो. साबुदाणा खिचडी, साबुदाणा खीर, भगर, थालिपीठ इत्यादी ठराविक पदार्थ खाल्ले जातात. पण कायमच साबुदाणे खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये साबुदाण्याची तिखट खीर बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. चला तर जाणून घेऊया साबुदाणा खीर बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)
Weekend Special : रविवारचा करा मजेदार बेत, घरी बनवा मसालेदार आणि चविष्ट ‘चिकन कोफ्ता करी’