प्रत्येक घरात असायला हवी गोकर्णाच्या निळ्या फुलांची वेळ.. ! जाणून घ्या गोकर्णाच्या फुलांचा चहा पिण्याचे फायदे
संधिवाताच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी गोकर्णाच्या फुलांचा चहा प्यावा. थंडीच्या दिवसांमध्ये सांध्यांमधील वेदना मोठ्या प्रमाणावर वाढू लागतात. या वेदना कमी करण्यासाठी उपाशी पोटी चहाचे सेवन करावे.
डोळ्यांची कमी झालेली दृष्टी सुधारण्यासाठी गोकर्ण अतिशय प्रभावी ठरते. त्यामुळे नियमित गोकर्णाच्या फुलांचा चहा किंवा काढा प्यावा. यामुळे त्वचेलासुद्धा अनेक फायदे होतील.
धावपळीच्या जीवनशैलीमुळे मानसिक तणाव वाढण्याची शक्यता असते. हा ताण कमी करण्यासाठी निळ्या रंगाच्या चहाचे सेवन करावे. चहाच्या आकर्षक रंगामुळे शरीराला अनेक फायदे होतात.
गोकर्णाच्या फुलांचा चहा बनवण्यासाठी सर्वप्रथम टोपात पाणी गरम करून घ्या. त्यानंतर त्यात गोकर्णाची फुले घालून व्यवस्थित उकळवा. तयार केलेल्या चहामध्ये मध मिक्स करून प्यायल्यास शरीराला अनेक फायदे होतील.
शरीर डिटॉक्स आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी गोकर्णाच्या फुलांचा चहाचा प्यावा. या चहामध्ये असलेले घटक ऍसिडिटी, गॅस आणि अपचनाच्या समस्येपासून आराम मिळवून देण्यासाठी प्रभावी ठरेल.