सोन्याच्या दरांबाबत एक मोठा अंदाज समोर आला असून, पुढील आर्थिक वर्षात सोन्याचे भाव ५,००० डॉलरच्या जवळ पोहोचू शकतात. अमेरिकेचे वाढते कर्ज, भू-राजनीतिक अनिश्चितता आणि मध्यवर्ती बँकांकडून मोठ्या प्रमाणावर होत असलेली सोन्याची खरेदी यामुळे सोन्याची मागणी सातत्याने वाढत आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोने स्वस्त भावात उपलब्ध असल्याने ही गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची संधी मानली जात आहे. ( सौजन्य - Pinterest )

जागतिक बाजारातील घडामोडी आणि तज्ज्ञांच्या अंदाजानुसार आगामी काळात सोन्याच्या किमतीत मोठी उसळी पाहायला मिळू शकते.

अमेरिकेचे वाढते कर्ज आणि मध्यवर्ती बँकांच्या सततच्या खरेदीमुळे पुढील आर्थिक वर्षापर्यंत सोने प्रति औंस ४,७०० ते ४,८०० डॉलरपर्यंत पोहोचू शकते.

जानेवारीतील उच्चांकावरून सोने सध्या सुमारे २०% सवलतीत (प्रति औंस सुमारे ४,४०० डॉलर) उपलब्ध असल्याने ही गुंतवणुकीची उत्तम संधी आहे.

अमेरिकेचे सरकारी कर्ज झपाट्याने वाढत असल्याने डॉलर कमकुवत होत असून, गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळत आहेत.

RBI आणि चीनसह जगभरातील मध्यवर्ती बँका अमेरिकन डॉलरवरील अवलंबित्व कमी करून सोन्याचा साठा वाढवत आहेत.






