कर्णधार बाबर आझम (फोटो- सोशल मिडिया)
सध्या पाकिस्तानचा संघ श्रीलंकेविरुद्ध टेस्ट सिरीज खेळत आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तान प्रथम फलंदाजी करत आहे. पाकिस्तानच्या पहिल्या इनिंगमध्ये कर्णधार बाबर आझम चांगली खेळी करत होता. त्याने शानदार अर्धशतकी खेळी देखील केली. मात्र त्याचे रूपांतर मोठ्या खेळीत म्हणजे शतकात करू शकला नाही. या इनिंगमध्ये बाबर आझमने 58 बॉलमध्ये 50 रन्सची महत्वाची खेळी केली. मात्र त्याला शतकी खेळी करता आलेली नाही. या खेळीनंतर त्याच्या नावावर एक नकोसा रेकॉर्ड नोंद झाला आहे.
ENG Vs PAK: बाबर आझमला इतिहासजमा करा! ४ वर्षे, ३९ डाव अन् झिरो सेंच्युरी, ‘फ्लॉप शो’ कायम
पाकिस्तानचा कसोटी कर्णधार बाबर आझमच्या नावावर एक नकोसा रेकॉर्ड नोंद झाला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त इनिंग शतकाविना खेळण्याच्या बाबतीत बाबर आझम आता पाकिस्तानचा संयुक्तपणे तिसरा फलंदाज ठरला आहे. गेल्या अनेक इनिंगमध्ये बाबरच्या बॅटमधून एकही शतक पाहायला मिळालेले नाही
रमीज राजा: ७४ इनिंग (शतकाविना)
यासीर हमीद: ४७ इनिंग (शतकाविना)
बाबर आझम आणि आसिफ मुजतबा: संयुक्तपणे ४१ इनिंग
गेल्या 41 इनिंगमध्ये बाबरच्या बॅटमधून एकही शतक आलेले नाही. त्यामुळे त्याच्या फॉर्मबाबत देखील आता चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे पुढील इनिंगमध्ये किंवा पुढील काही सामन्यांमध्ये तो शतक करून हा रेकॉर्ड मोडेल अशी अपेक्षा आता व्यक्त केली जात आहे. कर्णधार बाबर आझमने 41 इनिंगमध्ये एकही शतक केले नाहीये. मात्र त्याने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये एक मोठा टप्पा गाठला आहे. बाबर आझमने पाकिस्तानचा कर्णधार म्हणून सर्व फॉरमॅट्समध्ये 70 वेळेस आपला 50 पेक्षा अधिकचा स्कोअर पूर्ण केला आहे.
पाकिस्तान क्रिकेट इतिहासात कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५०+ स्कोर करण्याचा विक्रम माजी कर्णधार मिस्बाह-उल-हकच्या नावावर होता. मिस्बाहने आपल्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीत एकूण ७० वेळा ५० किंवा त्याहून अधिक धावांची खेळी केली होती. आता बाबर आझमने श्रीलंकेविरुद्धच्या या खेळीसह मिस्बाह-उल-हकच्या या विक्रमाची बरोबरी केली आहे.
अझान अवैस, मुहम्मद तैयब आरिफ, मोहम्मद ताहा, बाबर आझम (कर्णधार), सऊद शकील, सलमान अली आगा, मोहम्मद गाजी गोरी (यष्टिरक्षक), अराफात मिन्हास, रजाउल्लाह, मोहम्मद अब्बास आणि साकिब खान.
Eng vs Pak: 614 दिवसांनी सॅम आला अन् तातडीने झाला आउट! ऐटीत आलेल्या अयुबची 10 बॉलमध्येच…
पसिंदु सोरियाबंदारा, लाहिरू उदारा, दिनेश चंडीमल, कामिंदु मेंडिस, धनंजय डी सिल्वा, कुसल मेंडिस (यष्टिरक्षक/कर्णधार), सोनल दिनुशा, मिलन प्रियनाथ रथनायके, लाहिरू कुमारा, असिथा फर्नांडो आणि दिलशान मदुशंका.
Ans: पाकिस्तान कसोटी संघाचा कर्णधार बाबर आझमने 41 इनिंगमध्ये शतक केले नाही.
Ans: पाकिस्तान संघ सध्या श्रीलंकेविरुद्ध सिरीज खेळत आहे.






