केस कोरडे आणि निस्तेज झाले आहेत? रोजच्या आहारात करा 'या' हेल्दी पदार्थांचा समावेश
एवोकॅडो खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. यामध्ये विटामिन ई, निरोगी चरबी आणि अँटिऑक्सिडंट्स इत्यादी अनेक घटक आढळून येतात. यामुळे त्वचा आणि केस मजबूत होतात.एवोकॅडो खाल्यामुळे त्वचा मॉइश्चरायझ होते.
अक्रोड खाल्यामुळे मेंदूचे आरोग्य सुधारते. यामुळे त्वचेत वाढलेली जळजळ कमी होते. तसेच केसांच्या मुळांना पोषण देण्यासाठी अक्रोड खावे. नियमित २ ते ३ अक्रोड खाल्यास शरीराला अनेक फायदे होतील.
लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत रताळे खायला खूप आवडतात.यामध्ये बीटा-कॅरोटीन, विटामिन ए, विटामिन इ इत्यादी अनेक घटक आढळून येतात. त्यामुळे नियमित रताळ खावं. रताळ खाल्यामुळे शरीरात नवीन पेशी तयार होतात.
पालक खाल्यामुळे लोह, विटामिन ए, विटामिन सी आणि फॉलिक ऍसिड इत्यादी अनेक घटक आढळून येतात. त्यामुळे आहारात तुम्ही पालक सूप, पालक भाजी किंवा पालकपासून बनवलेल्या पदार्थाचे सेवन करू शकता.
क्विनोआ हे एक धान्य आहे. यामुळे शरीराला योग्य पोषण मिळते. यामध्ये असलेले फायबर शरीरासाठी गुणकारी आहेत. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी तुम्ही क्विनोआ खिचडी बनवून खाऊ शकता.