
बॉलिवूडची सुपरस्टार गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar) हिचा आज वाढदिवस.
नेहा आता जगभरातील ल्या टॉप गायिकांच्या रांगेत आली आहे. जगभरात यूट्यूबवर सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या गायिकाच्या यादीत नेहानं दुसऱ्या क्रमांकाचं स्थान पटकावलं होतं.
नेहा तिच्या गाण्यांमुळं चर्चेत असतेच परंतु तिच्या खासगी आयुष्याचीही चर्चा सुरू असते. तिचा इथपर्यंतचा प्रवास काही सोप्पा नव्हता. त्यामुळं ‘इंडियन आयडॉल’ या शोचं परिक्षण करताना ती नेहमी भावूक होताना दिसायची.
तिच्या या प्रवासाबद्दल तिच्या चाहत्यांना नेहमीच कौतुक वाटत असतं. शोमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांच्या संघर्षाच्या गोष्टी ऐकूण नेहाच्या डोळ्यात नेहमीच पाणी आलेलं प्रेक्षक पाहत असतात.
नेहाचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. नेहा आणि तिची बहीण सोनू देखील गायक असून त्या दोघी सुरुवातीला देवीच्या जागरण कार्यक्रमांमध्ये भजन गायच्या.
यासाठी तिला केवळ तिला केवळ ५०० रुपये मिळायचे. त्यानंतर ती ‘इंडियन आयडॉल’ या रिअॅलिटी शोमध्ये नेहा स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.
तिथूनच तिचा हा यशाचा प्रवास सुरू झाला. तिनं नंतर मागं वळून पाहिलं नाही.