Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maitreya Marathi Movie: मैत्री, मस्ती अन् प्रेमाचे रंग! ‘मैत्रेया’चं टायटल साँग प्रदर्शित; क्रांती रेडकरने पहिल्यांदाच गायला रॅप

Maitreya Marathi Movie: समर टाईम्स प्रॉडक्शन निर्मित ‘मैत्रेया’ या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन क्रांती रेडकर वानखेडे यांनी केलं आहे. मनोज खळतकर चित्रपटाचे निर्माते असून, अमन खळतकर सहनिर्माते आहेत. चित्रपटात समर, आयुषी, स्काय आणि रुची यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 22, 2026 | 03:45 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Maitreya Marathi Movie:  मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर लवकरच मैत्रीच्या अनोख्या दुनियेची सफर घडवणार आहे. नुकतच तिच्या ‘मैत्रेया’ या आगामी मराठी चित्रपटाचं टायटल साँग नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. मस्ती, मैत्री आणि प्रेमाच्या विविध रंगांनी सजलेल्या या गाण्याला सिद्धांत भोसले आणि क्रांती रेडकर यांच्या आवाजाची साथ लाभली आहे. विशेष म्हणजे, या गाण्याच्या निमित्ताने क्रांती रेडकरने पहिल्यांदाच रॅप लिहिलं असून ते गायलंही आहे.

मित्र-मैत्रिणींसोबतच्या बेधुंद क्षणांपासून प्रेमाच्या हळुवार भावनांपर्यंतचा प्रवास या गाण्यातून अनुभवायला मिळतो. मैत्रीतील मोकळेपणा, एकत्र असण्याचा आनंद आणि नात्यांमधून फुलणारा जिव्हाळा यांची सुंदर गुंफण गाण्यात पाहायला मिळते. मित्रांसोबत केलेली मजा, एकमेकांची चेष्टामस्करी आणि प्रत्येक प्रसंगात एकमेकांच्या पाठीशी उभं राहण्याची भावना या गाण्यातून प्रभावीपणे व्यक्त होते. त्याचबरोबर मैत्रीच्या नात्यात नकळत फुलणारं प्रेम आणि एकत्र घालवलेल्या क्षणांतून तयार होणाऱ्या आठवणी गाण्याला वेगळीच रंगत आणतात.

क्रांती रेडकरने पहिल्यांदाच लिहिला आणि गायला रॅप

‘मैत्रेया’च्या टायटल साँगचं आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे क्रांती रेडकरने पहिल्यांदाच रॅप लिहिण्याचा आणि गाण्याचा अनुभव घेतला आहे. सिद्धांत भोसले आणि क्रांती रेडकर यांच्या आवाजाने सजलेल्या या गाण्याचे बोल ओंकार मंगेश दत्त यांचे असून, पंकज पडघण यांनी संगीत दिलं आहे. शब्द, संगीत आणि आवाज यांचा सुरेख मेळ साधणारं हे गाणं मैत्रीच्या विश्वातील उत्साह आणि प्रेमाच्या हळुवार भावना एकत्र आणतं.

संगीतकार पंकज पडघण यांनी गाण्याच्या निर्मितीविषयी सांगितलं, “मैत्रीच्या नात्यात एक वेगळीच ऊर्जा आणि सहजता असते. मित्रांसोबतची धमाल, मस्ती, एकमेकांची चेष्टा आणि या सगळ्यातून निर्माण होणारा जिव्हाळा हे अनुभव प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग असतात. ‘मैत्रेया’च्या टायटल साँगमधून मैत्रीचा हाच उत्साह आणि तरुणाईचा आनंद संगीताच्या माध्यमातून व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. गाण्याचे शब्द आणि त्यातील भावना यांना साजेसं संगीत देताना त्यातला खेळकरपणा आणि भावनिक ओलावा जपण्यावर भर दिला. हे गाणं ऐकताना प्रेक्षकांना आपल्या मित्रांसोबतच्या आठवणी पुन्हा अनुभवता येतील, अशी आशा आहे.”

मैत्री आणि प्रेमाच्या नात्यांची भावनिक गुंफण

लेखिका-दिग्दर्शिका क्रांती रेडकर वानखेडे म्हणाली, “मैत्री आणि प्रेम ही आयुष्यातील अशी नाती आहेत, जी आपल्या जगण्यात आनंदाचे अनेक रंग भरतात. मित्रांसोबत केलेली धमाल, एकमेकांना चिडवणं, एकत्र घालवलेले क्षण आणि नकळत निर्माण होणारी भावनिक जवळीक या सगळ्याच गोष्टी खास असतात. ‘मैत्रेया’च्या टायटल साँगमधून मैत्रीची ही अनोखी दुनिया आणि त्यातील निरागस आनंद प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.”

Nadotsavam 2026: ठाण्यात रंगणार ‘नादोत्सवम २०२६’; पद्मश्री भिकल्या धिंडा यांच्या तारपा वादनासह ‘अभंग रिपोस्ट’ची खास प्रस्तुती

चित्रपटाचे निर्माते मनोज खळतकर यांनीही गाण्यातून मैत्रीच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं. ते म्हणतात, “मित्रांसोबतच्या आठवणी या प्रत्येकाच्या आयुष्यातील अनमोल ठेवा असतात. कधी हसवणारे, कधी भावूक करणारे, तर कधी आयुष्यभर चेहऱ्यावर हसू आणणारे हे क्षण आपल्या नात्यांना अधिक घट्ट करतात. ‘मैत्रेया’च्या टायटल साँगमधून मैत्री, प्रेम आणि तरुणाईच्या उत्साही जगण्याचं प्रतिबिंब दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हे गाणं पाहताना प्रेक्षकांना आपल्या मित्रांची आणि त्यांच्यासोबतच्या अविस्मरणीय क्षणांची नक्कीच आठवण होईल.”

Ayushmann Khurrana: आयुष्मान खुराना आणि ऑस्करविजेत्या गुनीत मोंगा पुन्हा एकत्र; ‘उडता तीर’मधून देशभक्तीचा नवा अंदाज

२० नोव्हेंबरला ‘मैत्रेया’ चित्रपटगृहांत

समर टाईम्स प्रॉडक्शन निर्मित ‘मैत्रेया’ या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन क्रांती रेडकर वानखेडे यांनी केलं आहे. मनोज खळतकर चित्रपटाचे निर्माते असून, अमन खळतकर सहनिर्माते आहेत. चित्रपटात समर, आयुषी, स्काय आणि रुची यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Web Title: Maitreya marathi movie title song released kranti redkar rap for the first time ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2026 | 03:45 PM

Topics:  

  • entertainment
  • Kranti Redkar Wankhede
  • marathi movie

संबंधित बातम्या

Janak Marathi Movie Teaser: बापाच्या सन्मानासाठी लेकीचा न्यायालयात लढा! सायली संजीवच्या ‘जनक’चा दमदार टीझर रिलीज
1

Janak Marathi Movie Teaser: बापाच्या सन्मानासाठी लेकीचा न्यायालयात लढा! सायली संजीवच्या ‘जनक’चा दमदार टीझर रिलीज

Ayushmann Khurrana: आयुष्मान खुराना आणि ऑस्करविजेत्या गुनीत मोंगा पुन्हा एकत्र; ‘उडता तीर’मधून देशभक्तीचा नवा अंदाज
2

Ayushmann Khurrana: आयुष्मान खुराना आणि ऑस्करविजेत्या गुनीत मोंगा पुन्हा एकत्र; ‘उडता तीर’मधून देशभक्तीचा नवा अंदाज

Nadotsavam 2026: ठाण्यात रंगणार ‘नादोत्सवम २०२६’; पद्मश्री भिकल्या धिंडा यांच्या तारपा वादनासह ‘अभंग रिपोस्ट’ची खास प्रस्तुती
3

Nadotsavam 2026: ठाण्यात रंगणार ‘नादोत्सवम २०२६’; पद्मश्री भिकल्या धिंडा यांच्या तारपा वादनासह ‘अभंग रिपोस्ट’ची खास प्रस्तुती

Sachin Pilgaonkar: सचिन पिळगांवकरांची ट्रोलिंगसाठी अँकरने मागितली माफी; अभिनेता म्हणाले, ‘लेव्हल सोडू नये’
4

Sachin Pilgaonkar: सचिन पिळगांवकरांची ट्रोलिंगसाठी अँकरने मागितली माफी; अभिनेता म्हणाले, ‘लेव्हल सोडू नये’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.