माझ्या नवऱ्याची बायको या सुप्रसिद्ध मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेला चेहरा अभिजित खांडकेकर नेहमीच चाहत्यांशी जोडलेला असतो. त्याचे कार्यक्रम तसेच मालिका सुरूच असतात. दरम्यान, खास मकरसंक्रांतीच्या निमित्ताने अभिजित खांडकेकरने त्याची पत्नी सुखदा खांडकेकरसह काही छायाचित्र शेअर केले आहेत.
अभिजित-सुखदाचे हा संक्रांती स्पेशल फोटोशूट पाहिला का? जाणून घ्या. ( फोटो सौजन्य - Social Media )
या छायाचित्रांमध्ये अभिनेता अभिजित खांडकेकर त्याच्या पत्नीसह दिसून येत आहे. संक्रांतीच्या या शुभ मुहूर्तावर हे photos शेअर केले आहेत.
सुखदा खांडकेकरच्या @morpankh या इंस्टग्राम हॅन्डलवरून हे छायाचित्र शेअर करण्यात आले आहेत. या फोटोसला प्रेक्षकांनी सुंदर प्रतिसाद दिला आहे.
छायाचित्रांमध्ये दोघे पती पत्नी फार सुंदर दिसत आहे. काळ्या रंगाच्या पारंपारिक वेशात दोघे नवरा बायको फार आकर्षक दिसत आहेत.
पोस्टखाली कॉमेंट्समध्ये चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे तसेच मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पोस्टखाली सुंदर असे कॅप्शन देण्यात आले आहे. कॅप्शनमध्ये नमूद आहे कि, "'मिठी मिठी' चाशनी...... 😉". तसेच छायाचित्रविषयीं थोडक्यात माहिती देण्यात आली आहे.