या देशाची राष्ट्रीय मिठाई आहे जिलेबी; भारतात कसं झालं आगमन? जाणून घ्या इतिहास
विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी किंवा एखाद्या शुभ प्रसंगी जिलेबी वाटली जाते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जिलेबी ही भारतीय मिठाई नाही.
जिलेबी भारताबाहेरून आली आणि देशाच्या कानाकोपऱ्यात प्रसिद्ध झाली.
जिलेबी ही ईरानमधील मिठाई आहे, असं म्हटलं जातं. ईरानमध्ये जिलेबीला जुलाबिया किंवा जुलुबिया असं म्हणतात.
इतिहासकारांच्या मते, 500 वर्षांपूर्वी जेव्हा तुर्की आक्रमणकर्ते भारतात आले, तेव्हा त्यांनी ते आपल्यासोबत भारतात जिलेबी घेऊन आले. तेव्हापासून भारतातही जिलेबी बनवली जाऊ लागली आणि हळूहळू ती लोकप्रिय झाली.
जिलेबी हा मुळात अरबी शब्द आहे. मध्ययुगीन पुस्तक 'किताब-अल-ताबिक'मध्ये 'जलाबिया' आणि मिठाई या शब्दाचा उल्लेख असल्याचं सांगितलं जात.
15 व्या शतकात भारतात जिलेबी तयार करण्यास सुरुवात झाली. बांगलादेशने स्वतंत्र राष्ट्र झाल्यानंतर जिलेबीला राष्ट्रीय मिठाई घोषित केले.