99 टक्के लोकांना माहिती नाही आपल्या स्मार्टफोनमध्ये कोणता प्रोसेसर आहे? अशा प्रकारे जाणून घ्या
तुमच्या फोनमधील प्रोसेसर जितका पावरफुल असेल तितकाच फोनचा परफॉर्मन्स चांगला असणार आहे. अनेक लोकं स्मार्टफोन खरेदी करताना स्मार्टफोनचा कॅमेरा तपासतात मात्र सर्व प्रोसेसरवर लक्ष देत नाहीत.
स्मार्टफोनमधील प्रोसेसर अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे. तुमच्या स्मार्टफोनमध्ये कोणता प्रोसेसर आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला काही सोपी प्रोसेस फॉलो करावी लागणार आहे.
स्मार्टफोनमध्ये कोणता प्रोसेसर आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वात आधी स्मार्टफोनमधील सेटिंग ॲप ओपन करा.
आता स्क्रोल डाऊन करा आणि अबाउट फोन ऑप्शनवर क्लिक करा. आता तुम्हाला प्रोसेसर सेक्शन दिसेल त्यावर क्लिक करा. तुमच्या फोनमध्ये कोणता प्रोसेसर आहे हे तुम्हाला इथे दिसणार आहे.
अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये प्रामुख्याने दोन प्रकारचे प्रोसेसर वापरले जातात, ज्यामध्ये स्नॅपड्रॅगन आणि मीडियाटेक प्रोसेसर समाविष्ट आहेत.