या ठिकाणी लग्नाच्या पोशाखात नाही तर विधवेच्या कपड्यांमध्ये होते नवरीची पाठवणी, काय आहे गावाची विचित्र परंपरा?
आता आम्ही तुम्हाला अशा एका गावाबद्दल सांगणार आहोत, जिथे वधूचे पालक तिला पांढऱ्या कपड्यांमध्ये सासरी पाठवतात.
मध्य प्रदेशातील मांडला जिल्ह्यातील भीमडोंगरी गावात हा आदिवासी क्षेत्र आहे. येथे लग्नानंतर फक्त पांढऱ्या कपड्यातच मुलीची पाठवणी केली जाते.
वधूच्या पांढऱ्या साडीमागे एक विशेष श्रद्धा आहे. या गावात गोंडी धर्माचे लोक राहतात. त्यांच्यामध्ये पांढरा रंग खूप शुभ मानला जातो.
म्हणूनच येथील पालक लग्नाच्या वेळी आपल्या मुलींना पांढरा पोशाख घालतात आणि इतर लोकं देखील पांढरा पोशाख घालतात.
पांढऱ्या लग्नाच्या पोशाखाव्यतिरिक्त, येथे फेऱ्या मारण्याचा विधी वधूच्या घरी होतो, परंतु वधूच्या घरी फक्त चार फेऱ्या मारल्या जातात.
यानंतर, उर्वरित तीन फेऱ्या वराकडे मारल्या जातात. येथील लोकांचा पांढरा पोशाख पाहून तुम्हाला हे ठरवता येणार नाही की हा लग्न आहे की दुःखाचा सोहळा आहे. (आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)