Rahul Gandhi on Election Commission: राजधानी नवी दिल्लीत दोन दिवसांपूर्वी लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहूल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्षावर थेट मतचोरीचे आरोप केले. कर्नाटकातील महादेवपुरा मतदारसंघात तब्बल १ लाख २५० बोगस मतदारांची नोंदणी करून निकाल पलटवण्यात आले, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. बोगस मतदारांच्या या नोंदणीवरू राहुल गांधी (Rahul Gandhi) चांगलेच आक्रमक झाले, महत्त्वाची बाब म्हणजे निवडणूक आयोगाने त्यांना दिलेल्या कागदपत्रांची सहा महिने पडताळणी करून त्यांनी थेट पुरावेच सादर केले.
राहुल गांधी यांनी गुरूवारी (28 ऑगस्ट) पत्रकार परिषद घेत थेट निवडणूक आयोगाकडूनच (Election Commission of India) मतचोरी होत असल्याचा आरोप केल्याने एकच खबळ उडाली आहे. त्यानंतर आयोगाकडून एक पत्र जारी करण्यात आले असून त्यात राहुल गांधी यांनी केलेले आरोप सत्य असल्याचे सिद्ध करावे, असे आव्हान केलं.पण राहूल गांधी यांच्या आरोपांनंतर निवडणूक आयोगाने आपली वेबसाईट बंद केल्याचे समोर आली आहे. इतकेच नव्हे तर महाराष्ट्र, बिहार , राजस्थान आणि मध्यप्रदेशच्या मतदार याद्यादेखील आयोगाच्या वेबसाईटवरून गायब केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. आम्ही दिलेल्या डेटाबाबत लोकांकडून निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन प्रश्न विचारत असल्याने आयोगाने त्यांची वेबसाईटच बंद करून ठेवली आहे. मध्यप्रदेश, राजस्थान, बिरार या वेबसाईट बंद केल्या आहेत. त्यांना माहिती आहे की या डेटासंदर्भात प्रश्न विचारण्यात आले तर त्यांचा संपूर्ण ढाच्या कोसळून जाईल.
त्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही निवणढू आयोगाच्या वेबसाईटवरून महाराष्ट्र,बिहार, मध्यप्रदेशच्या मतदारयाद्या गायब असल्याचा आरोप केला आहे. तर राहुल गांधी आणि जितेंद्र आव्हाड यांच्या या दाव्यांवर, महाराष्ट्र, बिहार, राजस्थान, हरियाणा निवडणूक आयोगाची वेबसाईट बंद नसल्याचे आयोगाकडून स्पष्टीकरण दिले आहे.
ChatGPT 5 vs ChatGPT 4: रीजनिंग, आउटपुट आणि परफॉर्मंसच्या बाबतीत कोण अधिक पावरफुल? जाणून घ्या
तर मतदार याद्यांबाबत बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, रामकमलदास याला ८० पोरं, म्हणजे त्याच्या एका बायकोला तीन पोरं झाली. मी ती यादी ट्विटदेखील केली आहे,. एकाच बापाला ४२ पोरं, सगळ्यांची वये २९ ते ६७ च्या आसपास, अनेक पोरं एकाच वर्षी जन्माला घालून रामकमलदासने विश्वविक्रम केला आहे. निवडणूक आयोगही खूपच पराक्रमी आहे, असा टोला आव्हाड यांनी लगावला आहे.