पांढऱ्या पेशी वाढवण्यासाठी 'या' पदार्थांचे सेवन करा
चवीला आंबट गोड असलेलं किवी हे पांढऱ्या पेशी वाढवण्यासाठी फायदेशीर आहे. डेंग्यू झाल्यानंतर रोजच्या आहारात कमीत कमी एक तरी किवीचे फळ खावे. यामुळे पांढऱ्या पेशी वाढण्यास मदत होते.
विटामिन सी ने समृद्ध असलेल्या फळांचे सेवन केल्याने पांढऱ्या पेशी वाढतात. विटामिन सी युक्त फळांमध्ये संत्रा, आवळा, लिंबू, शिमला मिरची इत्यादी पदार्थ तुम्ही खाऊ शकता.
गव्हाच्या रसाचे सेवन केल्याने नैसर्गिकरित्या पांढऱ्या पेशी वाढण्यास मदत होते. एक कप व्हीटग्रास ज्यूसमध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस पिळून हे सरबत प्यावे.
चवीला आंबट गोड असलेल्या मनुका खाल्ल्याने पांढऱ्या पेशी वाढतात. मनुक्यांमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्याने कमी झालेल्या पांढऱ्या पेशी वाढतात.
डेंग्यूमुळे शरीरातील पांढऱ्या पेशी कमी होतात. या पेशी वाढवण्यासाठी मेथी दाण्यांचे पाणी प्यावे. हे पाणी प्यायल्याने पेशी वाढण्यास मदत होईल.