उपवासामुळे ॲसिडीटी अपचनाचा त्रास होतोय? तुमच्या आहारामध्ये या पदार्थांचा करा समावेश
उपवासाच्या वेळी तुम्ही रताळ्याचे विविध पदार्थ खावू शकता. जसे की रताळ्याचा कीस किंवा रताळ्यामध्ये गूळ घालून शिजवलेल्या गोड फोडी करून खाता येतील. तसेच रताळे नसतेच शिजवून देखील खाता येऊ शकतील. हे अतिशय पौष्टिक आणि पचनासाठी खूप चांगले असते.
राजगिऱ्याच्या लाह्या, खीर, लाडू, वडी असे राजगिऱ्याचे विविध प्रकार उपवासाला खाता येतात. राजगिऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअम असते. त्यामुळे आपल्या आहारामध्ये नेहमी राजगिराचा समावेश करा.
उपवासाच्या दिवशी आहारामध्ये उपवासाच्या भाजणीच्या थालीपीठाचा समावेश करणे उत्तम मानले जाते. पोटासाठी देखील थालीपीठ चांगले असते. थालीपीठामुळे ॲसिडीटी, बद्धकोष्टता असे कोणत्याही प्रकारचे त्रास होत नाही.
उपवासाच्या दिवशी ताक प्यायला विसरू नका. अनेकांना दह्यामुळे ॲसिडीटी होते. मात्र ताकामुळे शांत वाटतं. म्हणून भरपूर पाणी असलेले पातळ ताक उपवासाच्या दिवशी अधूनमधून प्यायला हवं.
उपवासाच्या दिवशी ताजी फळ खाणे फायदेशीर ठरते. फळांमधून अॅण्टीऑक्सिडंट्स, विटॅमीन, खनिजे भरपूर प्रमाणात मिळतात त्यामुळे शरीरात दिवसभर ऊर्जा टिकून राहते.