Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kartiki Ekadashi 2026: कार्तिकी एकादशीला काय करावे आणि काय करू नये? जाणून घ्या नियम

Kartiki Ekadashi 2026: कार्तिकी एकादशी २० नोव्हेंबर रोजी आहे. हिंदू धर्मात कार्तिकी एकादशीला विशेष धार्मिक महत्त्व आहे. या दिवशी भक्त पूर्ण दिवस उपवास करतात आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जातो. कार्तिकी एकादशीला काय करावे आणि काय करू नये, जाणून घ्या नियम

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 19, 2026 | 10:10 AM
फोटो सौजन्य- गुगल

फोटो सौजन्य- गुगल

Follow Us
Follow Us:
  • कार्तिकी एकादशी २० नोव्हेंबर रोजी आहे
  • कार्तिकी एकादशीला काय करावे आणि काय करू नये
  • कार्तिकी एकादशीचे धार्मिक महत्त्व
 

हिंदू धर्मात कार्तिकी एकादशीला विशेष धार्मिक महत्त्व आहे. या दिवसाला देवउठनी किंवा प्रबोधिनी एकादशी असेही म्हटले जाते. यावेळी कार्तिकी एकादशी २० नोव्हेंबर रोजी आहे. धार्मिक मान्यतेनुसार, आषाढी एकादशीला योगनिद्रेत गेलेले भगवान विष्णू कार्तिकी एकादशीला जागे होतात. या दिवशी चातुर्मास संपतो. त्यामुळे या दिवसापासून शुभ आणि मंगल कार्यांना सुरुवात केली जाते, अशी मान्यता आहे.

महाराष्ट्रात या दिवशी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी मोठ्या संख्येने वारकरी आणि भाविक येतात. तसेच इतरही विठ्ठल मंदिरात भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी पाहायला मिळते. विठठ्ल मंदिरांना रोषणाई केली जाते. भजन, कीर्तन इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अनेक जण उपवास करतात, पूजा-अर्चा करतात आणि विठ्ठल नामाचा जप करतात. मात्र, एकादशीचे व्रत करताना काही नियम पाळणे महत्त्वाचे मानले जाते. जाणून घेऊया कार्तिकी एकादशीला काय करावे आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात.

कार्तिकी एकादशीला काय करावे?

सकाळी लवकर उठून स्नान करावे

कार्तिकी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. स्वच्छ कपडे परिधान करून भगवान विष्णू आणि विठ्ठल-रुक्मिणी यांचे स्मरण करावे. घरातील देवघर स्वच्छ करून पूजा करावी.

Kartiki Ekadashi 2026: कार्तिकी वारीत संत ज्ञानेश्वर-तुकाराम महाराजांच्या पालख्या का येत नाहीत? जाणून घ्या वारकऱ्यांची परंपरा

भगवान विष्णू आणि विठ्ठलाची पूजा करावी

या दिवशी भगवान विष्णू आणि विठ्ठलाची मनोभावे पूजा करावी. देवासमोर दिवा लावावा, धूप-अगरबत्ती दाखवावी आणि फुले, फळे अर्पण करावीत. तुळशीची पाने अर्पण करणेही शुभ मानले जाते.

विष्णू मंत्र आणि हरिनामाचा जप करावा

कार्तिकी एकादशीला ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ या मंत्राचा जप करावा. तसेच विष्णुसहस्रनाम, हरिपाठ आणि भगवद्गीतेचे पठण करावे. विठ्ठलाचे अभंग आणि भजन-कीर्तनात सहभागी व्हावे.

उपवासाचे पालन करावे

या दिवशी भाविक आपल्या श्रद्धा आणि शारीरिक क्षमतेनुसार उपवास करतात. काही जण निर्जळी उपवास करतात, तर काही जण फळे, दूध किंवा फराळाचे पदार्थ खाऊन व्रत करतात. उपवास करताना शरीराला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.

गरजू व्यक्तींना दान करावे

एकादशीच्या दिवशी अन्नदान, वस्त्रदान आणि गरजू व्यक्तींना मदत करणे पुण्यकारक मानले जाते. आपल्या क्षमतेनुसार गरजू व्यक्तींना अन्न किंवा आवश्यक वस्तूंचे दान करावे.

तुळशीची पूजा करावी

कार्तिकी एकादशीला तुळशीची पूजा करण्याची परंपरा आहे. तुळशीजवळ दिवा लावून प्रार्थना करावी. भगवान विष्णूंना तुळस प्रिय असल्याची धार्मिक मान्यता आहे.

Kartiki Ekadashi : कार्तिकी एकादशीला विठ्ठल मंदिरांमध्ये उत्साह; पंढरपूरसह या ठिकाणी केले जाते विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन

कार्तिकी एकादशीला काय करू नये?

तांदूळ आणि धान्य खाणे टाळावे

एकादशीच्या उपवासात तांदूळ, गहू, डाळी आणि इतर धान्य खाणे टाळले जाते. धार्मिक परंपरेनुसार या दिवशी धान्याचे सेवन करू नये, अशी मान्यता आहे.

मांसाहार आणि मद्यपान करू नये

एकादशीच्या दिवशी मांसाहार, मद्यपान आणि तामसिक पदार्थांचे सेवन टाळावे. सात्त्विक आहार आणि शुद्ध आचरण ठेवण्यावर भर दिला जातो.

राग आणि वादविवाद टाळावेत

या दिवशी कोणाशीही भांडण, वादविवाद किंवा अपशब्दांचा वापर करू नये. मन शांत ठेवून देवाचे स्मरण करावे आणि शक्य तितका वेळ भक्तीमध्ये घालवावा.

तुळशीची पाने तोडू नयेत

धार्मिक मान्यतेनुसार एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडणे टाळावे. पूजेसाठी आवश्यक असलेली पाने आदल्या दिवशीच काढून ठेवावीत, अशी परंपरा आहे.

दुसऱ्यांचा अपमान किंवा निंदा करू नये

एकादशीच्या दिवशी मन, वाणी आणि आचरण शुद्ध ठेवण्यावर भर दिला जातो. त्यामुळे कोणाचीही निंदा करणे, खोटे बोलणे किंवा दुसऱ्यांना त्रास देणे टाळावे.

उपवासाचा दिखावा करू नये

उपवास हा श्रद्धा आणि आत्मसंयमाचा भाग मानला जातो. त्यामुळे केवळ दिखाव्यासाठी उपवास करण्याऐवजी मनापासून भक्ती आणि प्रार्थना करावी.

कार्तिकी एकादशीचा उपवास सोडताना काय काळजी घ्यावी?

एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला सोडण्याची परंपरा आहे. याला पारणा असे म्हणतात. पारणा करताना आपल्या स्थानिक पंचांगानुसार योग्य वेळ पाहावी. सर्वप्रथम भगवान विष्णूंची पूजा करून नैवेद्य दाखवावा आणि त्यानंतर उपवास सोडावा. उपवास सोडताना हलका आणि सात्त्विक आहार घ्यावा.

कार्तिकी एकादशीचे धार्मिक महत्त्व

कार्तिकी एकादशीला प्रबोधिनी एकादशी असेही म्हटले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, भगवान विष्णू या दिवशी चार महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात. त्यामुळे चातुर्मासाची सांगता होऊन विवाह आणि इतर शुभ कार्यांना सुरुवात होते, असे मानले जाते. महाराष्ट्रात या दिवशी पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी वारकरी मोठ्या संख्येने दाखल होतात. विठ्ठल नामाचा गजर, भजन, कीर्तन आणि दिंडी सोहळ्यांमुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय होते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: कार्तिकी एकादशी कधी आहे

    Ans: कार्तिकी एकादशी २० नोव्हेंबर रोजी आहे

  • Que: कार्तिकी एकादशीला कोणाची पूजा केली जाते?

    Ans: कार्तिकी एकादशीला भगवान विष्णू आणि विठ्ठल-रुक्मिणी यांची पूजा केली जाते.

  • Que: कार्तिकी एकादशीच्या उपवासात काय खावे?

    Ans: उपवासात फळे, दूध, साबुदाणा, राजगिरा आणि भगर यांसारखे फराळाचे पदार्थ खाता येतात. उपवासाचे नियम परंपरेनुसार बदलू शकतात.

Web Title: Kartiki ekadashi 2026 doand do not of fasting rules pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2026 | 10:10 AM

Topics:  

  • Hindu Festival
  • hindu religion
  • Kartiki Ekadashi

संबंधित बातम्या

Thane News: कार्तिकी एकादशीनिमित्त ठाणे शहर विठ्ठलमय; मंदिरांमध्ये आकर्षक सजावट, भजन-कीर्तनाचे आयोजन
1

Thane News: कार्तिकी एकादशीनिमित्त ठाणे शहर विठ्ठलमय; मंदिरांमध्ये आकर्षक सजावट, भजन-कीर्तनाचे आयोजन

Tulsi Vivah 2026: विवाहात विलंब होतोय? तुळशी विवाहाच्या दिवशी करा हे उपाय
2

Tulsi Vivah 2026: विवाहात विलंब होतोय? तुळशी विवाहाच्या दिवशी करा हे उपाय

Amla Navmi 2026: आवळा नवमीला सुख समृद्धीसाठी तुमच्या राशीनुसार करा हे उपाय, जाणून घ्या
3

Amla Navmi 2026: आवळा नवमीला सुख समृद्धीसाठी तुमच्या राशीनुसार करा हे उपाय, जाणून घ्या

Black Thread on Feet: पायात काळा धागा बांधताय? 9 गाठींचे रहस्य आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या!
4

Black Thread on Feet: पायात काळा धागा बांधताय? 9 गाठींचे रहस्य आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.