मुंबईत सुरू होणार आहे अतरंगी जगाशी जोडलेले म्यूजियम, फोटो पाहून थक्क व्हाल
मुंबईत सुरू होणाऱ्या या म्युझियमचे नाव पॅराडॉक्स म्युझियम असे आहे. पॅराडॉक्स म्युझियम हा जगातील ग्लोबल ब्रॅंड आहे, जो इनोवेशन क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रगती करत आहे. येथे येणाऱ्या लोकांना कला, विज्ञान आणि ऑप्टिकल इल्यूजन यांचा एकत्रितपणे एक उत्तम अनुभव मिळेल.
या म्युझियमची सुरुवात 2022 मध्ये मिल्टोस कंबोराइड्स आणि साकिस तानिमानिडीस यांच्यासह बुद्धिमान लोकांनी केली होती. आज, पॅराडॉक्स म्युझियम एक वेगाने वाढणारे जागतिक ठिकाण बनले आहे
हे म्युझियम प्रथम ओस्लोमध्ये उघडले गेले यानंतर ते लंडन, पॅरिस, मियामी, स्टॉकहोम, बर्लिन, शांघाय, बार्सिलोना आणि इतर अनेक शहरांमध्ये पोहोचले. आणि आता हे म्यूजियम लवकरच भारतातील मुंबई शहरातही उघडणार आहे
हा म्युझियम ऑक्टोबरपासून सुरु करण्यात येणार आहे. संग्रहालयाची वेळ सोमवार-शुक्रवार: सकाळी 11 ते रात्री 8. शनिवार आणि रविवार - सकाळी 11 ते रात्री 8:30 अशी असेल
हा म्युझियम पाहण्यासाठी तुम्हाला फक्त एक तासाचा वेळ लागेल. किमतीबद्दल बोलायचे झाले तर, या म्युझियमचे तिकीट 500 रूपयांपासून सुरु होते.