Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Weather Update: 2025 च्या मान्सूनने बदलली शहराची वेळ; निरोपाची तयारी सुरू असताना पुन्हा पुन्हा हजेरी

वर्ष आणि डिसेंबर महिना संपत आलेला असतानाही काही भागात अजूनही पाऊस सुरु आहे.राज्यात गेल्या महिनाभरापासून थंडीचा कडाका आहे. उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरीमुळे गारठा वाढताना दिसतोय.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 31, 2025 | 11:56 AM
२०२५ च्या मान्सूनने बदलली शहराची वेळ; निरोपाची तयारी सुरू असताना पुन्हा पुन्हा हजेरी

२०२५ च्या मान्सूनने बदलली शहराची वेळ; निरोपाची तयारी सुरू असताना पुन्हा पुन्हा हजेरी

Follow Us
Close
Follow Us:
  • 2025 च्या मान्सूनने बदलली शहराची वेळ
  • निरोपाची तयारी सुरू असताना पुन्हा पुन्हा हजेरी
  • मुंबईच्या दैनंदिन जीवनावर थेट परिणाम
मुंबईसह महाराष्ट्रासाठी २०२५ मधील मान्सून हा केवळ प्रमाणामुळे नव्हे, तर त्याच्या लांबलेल्या कालावधीमुळे लक्षात राहिला. जूनमध्ये वेळेवर दाखल झालेल्या मान्सूनने सुरुवातीला अपेक्षेप्रमाणे वाटचाल केली, मात्र सप्टेंबर ओलांडून ऑक्टोबरपर्यंत पावसाने माघार न घेतल्याने, यंदा ‘लांबलेला पाऊस‘ हा मुंबईच्या दैनंदिन जीवनावर थेट परिणाम करणारा मुद्दा ठरला. जुलै-ऑगस्टमध्ये मुंबईत काही दिवसांतच अतिवृष्टीच्या घटना घडल्या. सखल भागांत पाणी साचणे, रेल्वे वाहतूक विस्कळीत होणे आणि रस्ते बंद पडणे हे चित्र परिचित होते, मात्र यंदा वेगळे ठरले ते सप्टेंबरनंतरही सुरू राहिलेल्या सरी. साधारणपणे मान्सूनच्या निरोपाची तयारी सुरू असताना पावसाने पुन्हा पुन्हा हजेरी लावल्याने महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेवर अतिरिक्त ताण आला.

बंड, राजीनामे, राडे, ड्रामेबाजी; अर्ज भरण्याच्या दिवशी राज्यात काय काय घडलं?

या लांबलेल्या पावसाचा परिणाम केवळ वाहतुकीपुरता मर्यादित न राहता रस्ते, उड्डाणपूल, मेट्रो आणि पायाभूत सुविधा कामांवर झाला. निचरा व्यवस्था ठराविक कालावधीतील पावसाचा विचार करून उभारलेली असल्याने ऑक्टोबरपर्यंत सुरू राहिलेल्या सरींनी तिच्या मर्यादा उघड केल्या. काही भागांत पाणी उपसण्यासाठी पंप सुरू ठेवण्याची वेळ सप्टेंबरनंतरही आली.

लांबलेला पाऊस हा बदलत्या हवामान पद्धतींचा संकेत

मुंबईबरोबरच कोकण पट्ट्यातही पावसाचा कालावधी वाढलेला दिसला, पश्चिम महाराष्ट्रात सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे खरीप पिकांची काढणी रखडली, तर मराठवाड्यात काही भागांत हा पाऊस दिलासादायक ठरला. मात्र सोयाबीन, कापूस आणि तूर यांसारख्या पिकांना लांबलेल्या पावसाचा फटका बसल्याचे चित्रही दिसले. म्हणजेच, पावसाचे प्रमाण समाधानकारक असले तरी त्याची वेळ बदलल्याने शेती व्यवस्थेवर नवे आव्हान उभे राहिले. हवामान तज्ज्ञांच्या मते, २०२५ मधील लांबलेला पाऊस हा अपवाद नसून बदलत्या हवामान पद्धतींचा संकेत आहे, अरबी समुद्रातील वाढलेले तापमान, कमी दाबाचे क्षेत्र आणि वारंवार सक्रिय होणाऱ्या हवामान प्रणाली यामुळे पावसाचा कालावधी वाढत असल्याचे निरीक्षण नौदवले जात आहे. त्यामुळे मान्सून कची येतो आणि कची जाती’ या पारंपरिक चौकटी आता पुरेशा ठरत नाहीत.

दीर्घकालीन नियोजनाचा पुनर्विचार अपरिहार्य

या पार्श्वभूमीवर मुंबईसारख्या शहरासाठी दीर्घकालीन नियोजनाचा पुनर्विचार अपरिहार्य ठरतो. निचरा व्यवस्था, पूर नियंत्रण, आपत्ती व्यवस्थापन आणि बांधकाम नियोजन हे सर्व घटक लांबलेल्या पावसाचा विचार करून अद्ययावत करणे आवश्यक आहे, अन्यथा दरवर्षी मान्सूननंतरही शहर पावसाशी झुंज देत राहील.

मान्सूनने मुंबईला दिला एक स्पष्ट इशारा

एकूणच, २०२५ मधील मान्सूनने मुंबईला एक स्पष्ट इशारा दिला आहे. पाऊस आता केवळ किती पडलो. यावर नाही तर तो किती काळ टिकतो, यावर शहराचे भवितव्य ठरणार आहे. लांबलेला पाऊस हीच बदलत्या हवामानाची नवी ओळख ठरत असताना त्यानुसार धोरणात्मक पावले उचलली गेली, तरच मुंबई पुढील आव्हानांसाठी सज्ज होऊ शकेल.

२०२५ पावसाचे महत्त्वाचे निरीक्षण

  • सप्टेंबरनंतरही मुंबईत अनेक दिवस पावसाच्या नोंदी
  • ऑक्टोबरमध्येही निचरा पंप कार्यरत ठेवण्याची वेळ
  • खरीप काढणीवर लांबलेल्या पावसाचा परिणाम
  • मान्सून संपण्याच्या पारंपरिक तारखाना खोडा

Mumbai Customs Action: मुंबई विमानतळावर कस्टम्सची मोठी कारवाई! ४० कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्ज, सोने आणि परकीय चलन जप्त

Web Title: Indian meteorological department has issued a rain alert for 5 states on 31 december 2025 news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2025 | 11:56 AM

Topics:  

  • maharashtra
  • Mumbai
  • Weather Update

संबंधित बातम्या

Mumbai Customs Action: मुंबई विमानतळावर कस्टम्सची मोठी कारवाई! ४० कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्ज, सोने आणि परकीय चलन जप्त
1

Mumbai Customs Action: मुंबई विमानतळावर कस्टम्सची मोठी कारवाई! ४० कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्ज, सोने आणि परकीय चलन जप्त

Mumbai News : पश्चिम मुंबईसाठी २००० मीटर लांबीचा विशेष आराखडा, कसा असेल प्रकल्प? जाणून घ्या…
2

Mumbai News : पश्चिम मुंबईसाठी २००० मीटर लांबीचा विशेष आराखडा, कसा असेल प्रकल्प? जाणून घ्या…

31st December Celebration : थर्टी फर्स्टला रात्रभर परिवहनसेवा, बेस्टच्या २५ जादा बसेस धावणार
3

31st December Celebration : थर्टी फर्स्टला रात्रभर परिवहनसेवा, बेस्टच्या २५ जादा बसेस धावणार

Mumbai: माजी सरन्यायाधीश चंद्रचूड असल्याची बनावट ओळख; ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून वृद्ध महिलेची 3.71 कोटींची फसवणूक
4

Mumbai: माजी सरन्यायाधीश चंद्रचूड असल्याची बनावट ओळख; ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून वृद्ध महिलेची 3.71 कोटींची फसवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.