चिकन-मटण खाण्याऐवजी आहारात करा 'या' आयर्नयुक्त पदार्थांचे सेवन
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं काजू खायला खूप आवडतात. काजूमध्ये कोलेस्ट्रॉल नियंत्रणात करणारे गुणधर्म आढळून येतात. याशिवाय १०० ग्रॅम काजूमध्ये जवळपास ६.६८ मिग्रॅ आयर्न आढळून येते.
पांढऱ्या तिळांपेक्षा काळे तीळ अतिशय प्रभावी असतात. काळे तीळ खाल्यामुळे शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात. यामध्ये फॅटी ऍसिड्स, अँटीऑक्सिडंट्स आणि आयर्न इत्यादी अनेक घटक आढळून येतात. त्यामुळे नियमित एक चमचे काळे तीळ खावेत.
शरीरात वाढलेला थकवा, अशक्तपणा कमी करण्यासाठी अंजीर खावे. नियमित सकाळी उठल्यानंतर तुम्ही एक किंवा दोन भिजवलेले अंजीर खाऊ शकता. यामध्ये भरपूर आयर्न असते.
पावभाजी, पुलाव किंवा इतर अनेक पदार्थांमध्ये मटार टाकले जातात. १०० ग्रॅम मटारमध्ये सुमारे १.५ मिग्रॅ आयर्न आढळून येते. त्यामुळे रोजच्या आहारात तुम्ही राजमा, सोयाबीन किंवा हिरवे मटार खाऊ शकता.
सकाळच्या नाश्त्यात कोणतेही तिखट किंवा तेलकट पदार्थ खाण्यापेक्षा मखाणाचे सेवन करावे. यामध्ये असलेले घटक शरीर कायमच निरोगी आणि हेल्दी ठेवण्यासाठी मदत करते.