महाराष्ट्रातील एकमेव असे गाव ज्याचे नाव घ्यायलाच फुटेल घाम; याचे नाव घ्यायचे म्हणजे लाजच बाजूला सारायची
हे अनोखे नाव म्हणजे, भोसरी. आपल्या मराठी भाषेत या नावाला अपशब्द मानत असले तरी खरंतर हे नाव पुण्यातील एका गावाला देण्यात आले आहे
राजा भोज यांची राजधानी म्हणून हे भोजापुरी नावाने ओळखले जायचे, या नावाचा अपभ्रंश भोसावरी असा झाला, पुढे त्याचे नाव भोसरी असे झाले
असे मानले जाते की, या ठिकाणाला भोसरी हे नाव 'भवसार' समाजावरुन पडले, कारण या ठिकाणी भवसार समाजाचे लोक मोठ्या प्रमाणात राहत होते
पुणे शहराच्या उत्तरेला १७ किलोमीटर अंतरावर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत भोसरी हा गाव वसले आहे
भोसरीचे नाव बारा गावे दुसरी तेव्हा एक नाव भोसरी असे अभिमानाने घेतले जाऊ लागले, कारण ते इतर गावांपेक्षा अधिक प्रगतशील होते
पूर्वीचे भोसरी हे गाव आता शहरात रुपांतरीत होत आहे. मुख्य म्हणजे, इथली लोकसंख्याही आता झपाट्याने वाढू लागली आहे