Why Keeping Shoes Upside Down is Bad Luck know Vastu Shastra and Remedies
अनेकदा आपण ज्येष्ठांना किंवा मोठ्यांना म्हणतांना ऐकलं असेल की चप्पल नेहमी व्यवस्थित ठेवावेत आणि नकारात्मकतेपासून बचाव करण्यासाठी उपाययोजना कराव्यात.
आपल्याला अनेकदा सांगितले जाते की दारात उलट पडलेल्या बूट किंवा सँडल असतील तर घरात भांडण होतात. पण फक्त भांडण होणं हे चप्पल सरळ करण्याचे एकमेव कारण नाही. यामागे मोठे शास्त्र दडलेले आहे.
बूट आणि चप्पल उलटे ठेवल्याने देवी लक्ष्मी कोपते आणि आर्थिक नुकसान होते. जर तुम्ही सातत्याने बूट आणि चप्पल उलटे ठेवत असाल तर घरातील माणसे आजारी पडण्याची शक्यता असते.
बूट आणि चप्पल कधीच उत्तर आणि पूर्व दिशेला ठेवू नयेत. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते. या दिशा लक्ष्मी देवीच्या मानल्या जातात. यामुळे या दिशांना बूट आणि चप्पल ठेवल्यास देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते.
बूट आणि चप्पल उलटे ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा नष्ट होते. म्हणून बूट आणि चप्पल नेहमी योग्य ठिकाणी ठेवाव्यात. जर बूट आणि चप्पल उलटे ठेवले तर शनिदेव रागवतात.वास्तुशास्त्रानुसार शनिदेवाला पायांचा कारक मानले जाते.
त्यामुळे आपल्या दाराबाहेर किंवा इतर ठिकाणी जर चप्पल उलटे राहिली तर शनिदेव रागावतात. यामुळे लक्ष्मी देवीचा अपमान होतो, ज्यामुळे आपल्या घरात अनेक नकारात्मक गोष्टी घडत असतात. तुम्ही एक उपाय करू शकता, घराबाहेर बंद कॅबिनेट आणि रॅकमध्ये बूट,चप्पल ठेवाव्यात. कारण बंद कॅबिनेट नकारात्मकता पसरण्यापासून रोखतात