फोटो सौजन्य - pinterest
जर्सी हा जगातील सर्वात वेगवान इंटरनेट स्पीड प्रदान करणारा देश आहे . फ्रान्स आणि इंग्लंड दरम्यान एक बेट देश आहे. या बेटावर जर्सी हा देश आहे. या देशाचे स्वतःचे विधिमंडळ प्रशासन आणि आर्थिक व्यवस्था आहे. या देशात इंटरनेट स्पीड 264.52 Mbps आहे .
या यादीत लिकटेंस्टीन 246.76Mbps सह दुसऱ्या स्थानावर आहे. मकाऊ 231.40 Mbps सह तिसऱ्या स्थानावर आहे. इंटरनेट स्पीडच्या यादीत आइसलँड 229.35 Mbps सह चौथ्या स्थानावर आणि जिब्राल्टर 2.627 Mbps सह पाचव्या स्थानावर आहे .
जगात असे काही देश आहेत जिथे इंटरनेटचा वेग सर्वात कमी आहे. यामध्ये अफगाणिस्तान देशाचा देखील समावेश आहे. या देशात इंटरनेटचा वेग फक्त 1.71 Mbps आहे. हा स्पीड येमेनमध्ये 1.79 Mbps, सीरियामध्ये 2.30 Mbps , पूर्व तिमोरमध्ये 2.50 Mbps आणि इक्वेटोरियल गिनीमध्ये 2.70 Mbps आहे.
शेजारील देश पाकिस्तान इंटरनेट स्पीडच्या बाबतीत 200 व्या स्थानावर आहे. येथे इंटरनेट स्पीड 5.32 Mbps आहे. बेलीझचा इंटरनेट स्पीड 38.86 Mbps आहे. बेलीझ 100 व्या स्थानावर आहे.
इंटरनेट स्पीडच्या बाबतीत भारत 74 व्या क्रमांकावर आहे . आपल्या देशात इंटरनेटचा सरासरी वेग फक्त 47.09 Mbps आहे . अमेरिका 12 व्या स्थानावर आहे . अमेरिकेत इंटरनेटचा वेग 136.48 Mbps आहे .