Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फ्रान्समध्ये मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी! १५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मुलांना डिजिटल प्लॅटफॉर्म नाही

अल्पवयीन मुलांच्या डिजिटल सुरक्षिततेचे रक्षण करण्यासाठी फ्रान्सने एक मोठे आणि कठोर पाऊल उचलले आहे. देशाच्या नॅशनल असेम्बलीने १५ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पूर्णपणे बंदी घालणारा कायदा मंजूर केला आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Jan 28, 2026 | 08:58 PM
फ्रान्समध्ये मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी! १५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मुलांना डिजिटल प्लॅटफॉर्म नाही

फ्रान्समध्ये मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी! १५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मुलांना डिजिटल प्लॅटफॉर्म नाही

Follow Us
Close
Follow Us:
  • फ्रान्समध्ये मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी
  • १५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मुलांना डिजिटल प्लॅटफॉर्म नाही
  • ब्रिटन, डेन्मार्क, स्पेन आणि ग्रीससारखे देशात ही लागू
 

मुले आणि अल्पवयीन मुलांच्या डिजिटल सुरक्षिततेचे रक्षण करण्यासाठी फ्रान्सने एक मोठे आणि कठोर पाऊल उचलले आहे. देशाच्या नॅशनल असेम्बलीने १५ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पूर्णपणे बंदी घालणारा कायदा मंजूर केला आहे. ऑनलाईन गुंडगिरी, हिंसाचार आणि मानसिक आरोग्याच्या धोक्यांना लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. अध्यक्ष इमॅन्युएल मैक्रॉन यांना सप्टेंबरमध्ये हा कायदा लागू व्हावा अशी इच्छा आहे. प्रस्तावित कायदा केवळ फेसबुक, इन्स्टाग्राम, टिकटॉक आणि स्नॅपचॅटसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालणार नाही तर मुलांना ऑनलाईन कनेक्ट होऊ देणाऱ्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरील सोशल नेटवर्किंग वैशिष्ट्‌यांवरही बंदी घालेल.

अल्पवयीन मुलांना डिजिटल हानीपासून वाचवण्यासाठी हे पाऊल एक महत्त्वाचे पाऊल मानले जाते. राष्ट्रपती मॅक्रॉन यांनी यापूर्वी तरुणांमध्ये वाढत्या हिंसाचार आणि आक्रमक वर्तनासाठी सोशल मीडियाला जबाबदार धरले आहे. त्यांनी फ्रान्सला ऑस्ट्रेलियाचे मॉडेल स्वीकारण्याचे आवाहन केले आहे, ऑस्ट्रेलियाने डिसेंबरमध्ये १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर जगातील पहिली बंदी लागू केली. पुढील शैक्षणिक वर्ष, सप्टेंबरपूर्वी फ्रान्समध्ये हा कायदा लागू व्हावा अशी मॅक्रॉनची इच्छा आहे.

कायदा सादर करताना, सेंट्रिस्ट पार्टीचे खासदार लॉरे मिलर यांनी संसदेत सांगितले की, हा कायदा समाजात स्पष्ट सीमा निश्चित करतो, सोशल मीडिया है निरुपद्रवी माध्यम नाही. आपली मुले पूर्वीपेक्षा कमी अभ्यास करत आहेत, कमी झोपत आहेत आणि सतत स्वतः ची इतरांशी तुलना करत आहेत. हा मुक्त विचारसरणीचा लढा आहे.

फ्रान्समध्ये या कायद्याला राजकीय पक्ष आणि सामान्य जनतेकडून व्यापक पाठिबा मिळाला आहे. उजव्या विचारसरणीचे खासदार थिएरी पेरेझ यांनी याला आरोग्य आणीबाणी सांगत म्हटले आहे की, सोशल मीडियाने सर्वांना बोलण्यासाठी व्यासपीठ दिले आहे, परंतु मुले त्याची सर्वांत मोठी किमत मोजत आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या निर्णयाचा परिणाम आता जागतिक स्तरावर जाणवत आहे. ब्रिटन, डेन्मार्क, स्पेन आणि ग्रीससारखे देशदेखील या मॉडेलचा अभ्यास करत आहेत. युरोपियन संसदेने युरोपियन यूनियनला सोशल मीडिया वापरासाठी केले आहे, जरी अंतिम निर्णय सदस्य राष्ट्रांवर सोडला आहे. किमान वय निश्चित करण्याचे आवाहन

Web Title: Social media banned for children in france

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2026 | 08:58 PM

Topics:  

  • india
  • Social Media

संबंधित बातम्या

Bangladesh Textile Industry: १ फेब्रुवारीपासून सूत गिरण्या बंद? बांगलादेशात उद्योगसंकट
1

Bangladesh Textile Industry: १ फेब्रुवारीपासून सूत गिरण्या बंद? बांगलादेशात उद्योगसंकट

History of Indian Budget: जेम्स विल्सनपासून निर्मला सीतारमणपर्यंत; अर्थसंकल्पाचा थक्क करणारा इतिहास जाणून घ्या एका क्लिकवर 
2

History of Indian Budget: जेम्स विल्सनपासून निर्मला सीतारमणपर्यंत; अर्थसंकल्पाचा थक्क करणारा इतिहास जाणून घ्या एका क्लिकवर 

Kia Sonet: 24.1 KMPL मायलेज, सनरूफ आणि ADAS…! किया सोनेटने ५ लाख युनिट्स विक्रीचा टप्‍पा गाठला
3

Kia Sonet: 24.1 KMPL मायलेज, सनरूफ आणि ADAS…! किया सोनेटने ५ लाख युनिट्स विक्रीचा टप्‍पा गाठला

UGC New Rules:  यूजीसीच्या नवीन नियमांमुळे दिल्लीत निदर्शने; भाजप नेत्यांचे राजीनामे, उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवटीची मागणी
4

UGC New Rules: यूजीसीच्या नवीन नियमांमुळे दिल्लीत निदर्शने; भाजप नेत्यांचे राजीनामे, उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवटीची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.