ही आहेत 5 ओव्हरटुरिझम डेस्टिनेशन्स, लोकांची वाढती गर्दीच ठरणार का विनाशाचे कारण
ओव्हरटुरिझम ही एक नवीन समस्या म्हणून उदयास आली आहे. पर्यटकांच्या प्रचंड गर्दीमुळे केवळ ट्रॅफिकच जाम होत नाही तर प्रदूषण आणि स्थानिक संसाधनांचे नुकसानही होते.
हिमाचल प्रदेशचे हिल स्टेशन मनाली पर्यटकांच्या प्रचंड गर्दीशी झुंजत आहे. दिल्ली एनसीआरच्या जवळ असल्यामुळे, लोक वीकेंडचा आनंद घेण्यासाठी मनालीला जातात, ज्यामुळे येथील नैसर्गिक सौंदर्यावर परिणाम होत आहे.
उत्तराखंडमधील प्रमुख धार्मिक स्थळ केदारनाथलाही अतिपर्यटनाचा सामना करावा लागत आहे. यात्रेकरूंच्या लांबच लांब रांगा लागल्याने येथील परिसंस्थेवर ताण वाढत आहे.
धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले वाराणसी, ज्याला काशी असेही म्हणतात, पर्यटकांच्या अत्याधिक गर्दीचा सामना करत आहे. सध्या घाटांवर गर्दी चांगलीच वाढली आहे. अतिपर्यटनामुळे गंगा नदीचे प्रदूषणही वाढत आहे.
साहसी आणि ट्रेकिंग पर्यटनाच्या वाढत्या प्रभावामुळे लडाखला अतिपर्यटनाचा सामना करावा लागत आहे. अतिपर्यटनामुळे येथील पर्यावरणावर मोठा परिणाम झाला आहे
उत्तराखंडमधील ऋषिकेश हे हिल स्टेशन प्रचंड गर्दीचा आणि वेगाने शहरीकरणाचा सामना करत आहे. ट्रॅफिक जाम, जलप्रदूषण अशा समस्या ऋषिकेशबद्दल अनेकदा ऐकायला मिळतात.