मुंबई : संगीतविश्वातली महान गायिका लता मंगेशकर पंचतत्वात विलीन झाल्या आहेत. आज वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील (Mumbai) ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy) अखेरचा श्वास घेतला. या गान सम्राज्ञीला अखेरचा निरोप देण्यासाठी बॅालिवूडसह, राजकीय, क्रिडा क्षेत्रातील मान्यवरांनी शिवाजी पार्कवर हजेरी लावली होती. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोंदीससह, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, शरद पवार, शाहरुख खान, सचिन तेंडुलकर यांचा समावेश आहे. सगळ्यांनी साश्रू नयनांनी स्वर सम्राज्ञीला निरोप दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवाजी पार्क येथे लता मंगेशकर यांना श्रध्दांजली दिली.
राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनीही लतादीदींना आदरांजली वाहिली.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी लता मंगेशकर यांना श्रध्दांजली वाहिली.
मंत्री आदित्य ठाकरेंसह रश्मी ठाकरे यांनीही लतादीदींना आंदराजली वाहिली.
यावेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर देखील उपस्थित होता.