Tech Tips: मायक्रोवेव्हचा वापर करताना घातक ठरू शकतो तुमचा निष्काळजीपणा, लक्षात ठेवा या गोष्टी
मायक्रोवेव्हमध्ये कोणत्याही प्रकारचा धातू ठेवणे सर्वात मोठा धोका आहे. अॅल्युमिनियम फॉइल, स्टीलचे चमचे किंवा धातूच्या प्लेट्समुळे आग लागू शकते.
मायक्रोवेव्हमध्ये अंडी गरम करू नये. यामुळे मायक्रोवेव्हमधील दाब वाढतो आणि अंडी फुटू शकते, ज्यामुळे मोठा स्फोट होऊ शकतो.
सर्व प्रकारचे प्लास्टिक मायक्रोवेव्हसाठी सुरक्षित नसते. कारण स्वस्त प्लास्टिक कंटेनर गरम केल्यावर रसायने सोडतात, जी अन्नात मिसळल्यास आरोग्यासाठी विषारी बनू शकतात.
मायक्रोवेव्हमध्ये कागदी पिशवी, वर्तमानपत्र किंवा टिश्यू पेपर ठेवल्याने आग लागण्याचा धोका वाढतो.
मायक्रोवेव्हमध्ये सूप, दूध किंवा पाणी गरम कराताना त्यावर झाकण ठेवा.
मायक्रोवेव्हचा वापर करताना सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे.