सॅमसंग ग्राहकांसाठी घेऊन आलाय खास गिफ्ट! 'फॅब ग्रॅब फेस्ट'दरम्यान आकर्षक किमतीत अनुभवता येणार AI ची क्षमता
भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड सॅमसंगने त्यांच्या ग्राहकांसाठी पुन्हा एकदा काही विशेष ऑफर्स सादर केल्या आहेत. कंपनीने सणासुदीसाठी सर्वात मोठा शॉपिंग ईव्हेंट ‘फॅब ग्रॅब फेस्ट’ चे आयोजन केले आहे. या ईव्हेंटमध्ये ग्राहकांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) चा अनुभव घेता येणार आहे. कंपनीने ग्राहकांना आवाहन केलं आहे की, ‘फॅब ग्रॅब फेस्ट’दरम्यान आकर्षक किमतींत आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय)च्या क्षमतेचा अनुभव घ्यावा.
‘फॅब ग्रॅब फेस्ट’दरम्यान ग्राहक सॅमसंगच्या एआय-समर्थित टीव्ही, रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशिन्स, स्मार्टफोन्स, मॉनिटर्स, साऊंड डिवाईसेस विशेष उत्सवी ऑफर्ससह खरेदी करू शकतात. ग्राहकांकडे सॅमसंगच्या सर्वोत्तम परिसंस्थेत अपग्रेड होण्याची अल्टिमेट संधी आहे. जीएसटी कपातीनंतर नवीन कमी झालेल्या किमती आता एसी, टीव्ही आणि मॉनिटर्सवर देखील लागू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे होम अप्लायंसेस ग्राहकांना कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
प्रत्येक घरात स्मार्ट राहणीमान राहावे यासाठी सॅमसंग आपल्या एआय-संचालित नाविन्यतांच्या शक्तिशाली पोर्टफोलिओसह आला आहे. स्मार्टफोन्समधील अभूतपूर्व गॅलेक्सी एआयपासून ते रिअल-टाइम भाषांतर सक्षम करणाऱ्या, सर्वोत्तम दर्जाच्या फोटो एडिटिंग आणि उत्पादकता साधनांपर्यंत आणि सुधारित कार्यक्षमतेसाठी वापराचे नमुने शिकणाऱ्या सामग्री आणि उपकरणे कस्टमाइझ करणारे एआय-सक्षम टेलिव्हिजनपर्यंत, सॅमसंग कृत्रिम बुद्धिमत्ता सुलभ आणि प्रभावी बनवत आहे. दैनंदिन टास्क्स सर्वोत्तम, वैयक्तिकृत आणि कनेक्टेड करण्यासाठी कंपनीने स्मार्टफोन, टीव्ही, रेफ्रिजरेटर किंवा वॉशिंग मशिन असे डिव्हाईस डिझाईन केले आहेत. फॅब ग्रॅब फेस्ट दरम्यान मोठ्या प्रमाणात सणासुदीच्या सवलती, कॅशबॅक ऑफर आणि अपग्रेड प्रोग्रामसह, सॅमसंगची पुढील पिढीचे एआय तंत्रज्ञान घरी आणण्याची ही योग्य वेळ आहे.
गॅलेक्झी झेड फोल्ड७, गॅलेक्झी झेड फ्लिप७, गॅलेक्सी एस२५ अल्ट्रा, गॅलेक्सी एस२४ एफई, गॅलेक्सी ए५६ या स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना जवळपास ५३ टक्क्यांची सूट दिली जात आहे. याशिवाय ग्राहक जवळपास १२,००० रूपयांच्या त्वरित बँक सूटचा लाभ घेऊ शकतात. गॅलेक्सी एआय आणि आकर्षक फोल्डेबल डिस्प्ले सारख्या फीचर्सचा अनुभव घेण्याची हीच योग्य संधी आहे. गॅलेक्सी बुक५ प्रो ३६०, गॅलेक्सी बुक५ आणि बुक४ सिरीजवर सुमारे ५९ टक्क्यांची सूट दिली जात आहे. तसेच या खरेदीवर १७,४९० रूपयांची त्वरित बँक सूट देखील ऑफर केली जात आहे.
रेफ्रिजरेटर्सच्या खरेदीवर ग्राहकांना जवळपास ४६ टक्के डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. सॅमसंग वॉशिंग मशिन्सच्या खरेदीवर ग्राहकांना जवळपास ४८ टक्के सूट दिली जाणार आहे. किचन अपग्रेड्ससाठी सॅमसंग मायक्रोवेव्ह्जच्या खरेदीवर ३९ टक्के सूट दिली जाणार आहे. एअर कंडिशनर्सच्या खरेदीवर जवळपास ४८ टक्के सूट उपलब्ध आहे. ग्राहक एचडीएफसी, एसबीआय आणि इतर आघाडीच्या बँक कार्डच्या माध्यमातून पेमेंट केल्यासह जवळपास २७.५ टक्के कॅशबॅक (जवळपास ५५,००० रूपये) मिळवू शकतात.