Elon Musk च्या पोस्टनंतर युजर्स का रद्द करत आहेत Netflix चं सब्सक्रिप्शन? काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एलन मस्कने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनंतर सर्व सोशल मीडियावर गोंधळ निर्माण झाला. खरं तर मस्कने सोशल मीडियावर नेटफ्लिक्स विरोधात एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनंतर सर्व युजर्स त्यांचे नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शन कॅन्सल करत आहेत. मस्कने अशी कोणती पोस्ट शेअर केली आहे आणि या पोस्टनंतर लोकं त्यांचे नेटफ्लिक्स सब्स्क्रिप्शन का रद्द करत आहेत, याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.
एलन मस्कने त्यांच्या सोशल मीडिया फॉलोअर्सना स्ट्रीमिंग प्लेटफॉर्म नेटफ्लिक्सचं सब्सक्रिप्शन रद्द करण्याची विनंती केली. मस्कने पोस्ट शेअर करत लिहीलं की, तुमच्या मुलांच्या आरोग्यासाठी तुमचे नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन रद्द करा. त्यानंतर यूजर्स त्यांच्या नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन रद्द करण्याचे स्क्रीनशॉट एक्सवर शेअर करू लागले. (फोटो सौजन्य – Pinterest)
Netflix शो Dead End: Paranormal Park चे निर्माता हॅमिश स्टीलनेयांनी रूढीवादी कार्यकर्ते चार्ली कर्क यांच्याबद्दल एक आक्षेपार्ह पोस्ट पोस्ट केली तेव्हा हे संपूर्ण प्रकरण सुरू झाले. स्टीलने त्याला “नाझी” म्हणून संबोधले आणि त्याच्या मृत्यूची खिल्ली उडवल्याचा आरोप केला, ज्यामुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त झाला आणि मस्कने नेटफ्लिक्सवरही टीका केली. मस्कचं म्हणणं आहे की, Netflix केवळ अशा लोकांना काम देते जे द्वेष पसरवतात. याशिवाय त्यांच्या कंटेंटचा मुलांवरही नकारात्मक परिणाम होत. त्यामुळे तुमच्या मुलांच्या आरोग्यासाठी नेटफ्लिक्स प्लॅन रद्द करा. याशिवाय मस्कने Netflix वर भेदभाव करत असल्याचा आरोप केला आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सचा मालक एलन मस्क वोकिज्मचा सुरुवातीपासून विरोध करत आहेत. आता त्यांनी नेटफ्लिक्सवर काही गंभीर आरोप लावले आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, नेटफ्लिक्स आपल्या कंटेटद्वारे ‘ट्रान्सजेंडर जागृत अजेंडा’ चा प्रचार करत आहे. 2022 मध्ये मस्कने एका पोस्टमध्ये त्याला “वेक माइंड व्हायरस” म्हटले होते. त्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले होते की “वेक माइंड व्हायरस” एकतर पराभूत होईल किंवा दुसरे काहीही टिकणार नाही.
एलन मस्कने एक्सवर शेअर केलेल्या या पोस्टनंतर मोठ्या संख्येने यूजर्स त्यांचे नेटफ्लिक्स प्लॅन रद्द करण्याचे स्क्रीनशॉट शेअर करत आहेत. तसेच या पोस्टमध्ये युजर्स नेटफ्लिक्सला टॅग देखील करत आहेत. बरेच लोकं मस्कला सपोर्ट करत असले तरी देखील अनेक युजर्स आहेत, जे मस्कच्या या घोषणेला विरोध करत आहेत. केवळ नेटफ्लिक्सच नाही तर एलन मस्क यानी विकिपीडियावर देखील टीका केली आहे आणि त्याला पक्षपाती म्हटले आहे. मस्क यांनी काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती की त्यांची कंपनी, xAI, लवकरच विकिपीडियाचा पर्याय म्हणून ग्रोकिपीडिया विकसित करत आहे.